नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटारने (Toyota Kirloskar Motor) भारतातील लोकप्रिय एमपीव्ही इनोव्हा क्रिस्टाच्या (MPV Innova Crysta) च्या डिझेल इंजिन व्हेरिएंटची बुकिंग तात्पुरती बंद केली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून या व्हेरिएंटचे बुकिंग थांबवले आहे, पण महिन्याच्या शेवटी कंपनीने याची घोषणा केली आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी कार आधीच बुक केली आहे, त्यांना कंपनी इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरिएंट डिलीव्हर करणार आहे. इनोव्हा क्रिस्टा पेट्रोल इंजिन व्हेरिएंटचे बुकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याबाबत कंपनीने अधिकृत निवेदनही जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, "टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटच्या प्रचंड मागणीमुळे, या एमपीव्हीवर मिळणाऱ्या व्हेरिएंट कालावधी लक्षणीय वाढला आहे, ज्यामुळे कंपनीने या व्हेरिएंटच्या नवीन बुकिंगवर तात्पुरती बंदी घातली आहे."
टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल व्हेरिएंटवर मिळणाऱ्या प्रतीक्षा कालावधीबद्दल सांगायचे तर, कंपनी यावर 5 ते 7 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी देत आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारने भारतात टोयोटा इनोव्हा क्रिस्टाला 2016 मध्ये लॉन्च केले होते. जर कंपनीच्या विक्रीबद्दल बोललो, तर कंपनीने या एमपीव्हीचे 19693 युनिट्स गेल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये विकले.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल इंजिन वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 2.4 लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 150 PS पॉवर आणि 360 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, कंपनीने 2.7-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 166 PS पॉवर आणि 245 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह, कंपनी 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देते.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग बंद होण्यामागे कंपनी निःसंशयपणे वाढत्या मागणीचे कारण देत आहे, परंतु रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ऐवजी आपली नवीन एमपीव्ही सादर करणार आहे. या नवीन एमपीव्हीचे नाव टोयोटा इनोव्हा Toyota Innova HyCross असेल, ज्याचा ट्रेडमार्क कंपनीने भारतात नोंदणीकृत केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार्या दिवाळीच्या सणासुदीत कंपनी ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सादर करू शकते. टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस ही नवीन पिढीची हायब्रिड एमपीव्ही असेल, जी इनोव्हा क्रिस्टा पेक्षा चांगली फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि हायब्रिड इंजिनसह बाजारात आणली जाईल.