वाहतुकीचे नियम मोडले की चलन घरी येऊन पोहोचते. तेव्हा ती रक्कम भरताना पश्चाताप होतो किंवा अनेकजण ती भरतच नाहीत. मग त्यांचे काय होते. ते वाहन ब्लॅकलिस्ट केले जाते. म्हणजेच ते वाहन विकणे किंवा दुसऱ्याच्या नावावर करणे आदी आरटीओची कामे करता येत नाहीत. तो दंड भरून तुम्हाला वाहन काळ्या यादीतून बाहेर काढावे लागते. यात कायदेशीर गुंतागुंतदेखील असते. मग कशाला एवढी लफडी करा, त्यापेक्षा वाहतुकीचे नियम पाळले तर किती बरे होईल.
अनेकदा राँग साईडने वाहने चालविली जातात. थोडासा वळसा मारला तर दंड पण होणार नाही आणि अपघातही होणार नाही. पण नाही. कोण जाईल, त्यापेक्षा लाईट चालू करू आणि विरुद्ध दिशेने निघू असे अनेकजण म्हणतात आणि दुसऱ्यांचा जिवही धोक्यात घालतात. आता अशा प्रकारच्या उल्लंघनांवर किती दंड आकारला जातो? काही कॉमन कारणे आणि त्यांचे दंड..
- अल्पवयीन वाहन चालवताना सापडला तर पालकांना 25000 रुपये दंड होतो, शिवाय तीन महिन्यांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
- ओव्हरस्पीडिंग 2000 रुपयांपर्यंत दंड
- सीट बेल्टशिवाय गाडी चालवल्यास 1000 दंड
- चप्पल घालून दुचाकी चालवल्यास 1000 रुपये दंड
- आरसीशिवाय गाडी चालवल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड
- दारू पिऊन गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा
- दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालवल्यास 15 हजार रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा
- परवानगीपेक्षा जास्त लोक प्रवास करत असल्यास, 1000 रुपये प्रति व्यक्ती दंड
- विम्याशिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास
- वाहनाचे ओव्हरसाइजिंग - रु. 5000
- ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड
- हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास 1000 रुपये दंड
- परमिटशिवाय वाहन चालवणे - 10,000 रु
- हे दंड प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असू शकतात.रेसिंग, ओव्हर स्पीड...रेसिंग करताना पकडले गेल्यास, तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. पहिल्यांदा सापडल्यास त्याला चलन आणि इशारा देण्यात येतो. गुन्ह्याचे स्वरुप पाहिले जाते, गरज पडली तर लायसन रद्द केले जाते.