सिलिकॉनच्या स्टिअरिंग कव्हरचा आकर्षक व चांगला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 04:55 PM2017-12-20T16:55:37+5:302017-12-20T16:56:26+5:30

सिलिकॉनचे स्टिअरिंग कव्हर हे कारसाठी अतिशय सुलभ, घट्ट बसणारे व वॉशवेअरला सोपे आहे. कोणत्याही आकाराच्या स्टिअरिंग व्हीलला चपखल व घट्ट बसू शकते.

useful and easy silicon steeringcover | सिलिकॉनच्या स्टिअरिंग कव्हरचा आकर्षक व चांगला पर्याय

सिलिकॉनच्या स्टिअरिंग कव्हरचा आकर्षक व चांगला पर्याय

googlenewsNext

कारच्या स्टिअरिंगला छानपैकी कव्हर असावे म्हमून अनेकजण विविध प्रकारची स्टिअरिंग कव्हर्स बाजारात शोधत असतात. भारतामध्ये अशा प्रकारच्या तयार शिवलेल्या कव्हरापासून ही स्टिअरिंग कव्हर्स मिळतात. त्यामध्ये कृत्रिम लेदर, फर, वेलवेट यांचा वापर केलेल्या व शिवलेल्या वा स्टिअरिंगला गुंडाळण्याच्या पद्धतीची कव्हर्स मिळतात. स्टिअरिंगसाठी असमारे कव्हर तुम्ही ज्या पद्धतीने व ज्या स्थितीत वापरणार असता ते महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी स्टिअरिंग कव्हर तुमच्या कारच्या स्टिअरिंगवर चढवण्यापूर्वी नीट विचारपूर्वक विकत घ्या. 

कंपनीकडून नवी कार ग्राहकाला मिळते तेव्हा तुम्हाला असे स्टिअरिंग कव्हर उच्च श्रेणीमध्ये दिलीही जाते. त्याची सवय अनेकांना असते. मात्र सर्वांनाच ते कव्हर आवडते असे नाही दुसरी बाब या कव्हरचे आयुष्यही ठरलेले असते. तुम्हाला त्यामुळे ते कव्हर कालांतराने बदलावे लागते. त्याला कारणे अनेक असतात. मात्र हे कव्हर तुमच्या वाहन चालनातील सर्वात महत्त्वाच्या कृतीशी निगडित असतात, हे लक्षात घ्या. वाहन वळवताना तुमच्या हातांची पकड या स्टिअरिंगवर व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यासाठी हे स्टिअरिंगवरील कव्हर त्या स्टिअरिंगच्या आतील भागाला घट्टपणे बसले जाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्टिअरिंग कव्रला बाहेरच्या बाजूने हाताची पकड असते तेव्हा हाताला घाम येणे, पाणी, तेल लागलेले असणे शक्य असते. अशावेळीही मुळात तुम्ही हात स्वच्छ करून स्टिअरिंगवर बसले पाहिजे. मात्र तसे नसेल तर स्टिअरिंग कव्हरवरून हात सरकणे- निसटणे अशा क्रिया घडतात, ज्या काहीवेळा घातकही ठरू शकतात. यासाठी स्टिअरिंग कव्हर घालताना योग्य विचार करून घातले गेले पाहिजे. सौंदर्य व हाताला मऊ लागायला हवे, अशा संवेदनांचा विचार करून स्टिअरिंग कव्हर घेणे अयोग्य असते. यामध्ये सिलिकॉनचे एक रबरासारखे कव्हर मिळते. ऑनलाइन वा बाजारातही ते उपलब्ध असते. स्टिअरिंग व्हीलच्या आकारानुसार साधारण कव्हर मिळतात पण सिलिकॉन कव्हर सर्वांना चपखलपणे घट्ट बसू शकते, अशा आकारात मिळते. अन्यथा भारतीय बनावटीचे कव्हर हे फोम लेदर वा अन्य स्वरूपात स्टिअरिंगवर चढवावे लागते, त्या पद्धतीचे असते, तेव्हा त्या व्हीलच्या आकारानुसार ते मिळते. मात्र सिलिकॉन कव्हरला त्याचे बंधन नसते. साधारण रबरासारखे दिसणारे हे कव्हर विविध रंगामध्ये मिळते. त्यामुळे तुम्हाला रंगाचा पर्यायही उपलब्ध असतो. हात ओले असले तरी या कव्हरवरून सरकत नाही. हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेकदा ओले हात घेऊन वाहन चालवण्यासाठी बसले जाते. तेव्हा हात सरकण्याची समस्या या कव्हरला नाही. दुसरी बाब ते स्वच्छ करण्यासही सोपे व चांगले असते. त्यामुळे ते खराब होत नाही. कव्हर सहज काढता व घालता येते. साबणाने स्वच्छ करता येते. शिलाई नसल्याने कालांतराने त्याची शिलाई उसवणे व ती हाताला लागणे हा प्रकार यामध्ये नाही. अशा प्रकारची ही सिलिकॉनची स्टिअरिंग कव्हर्स भारतीय बनावटीची नाहीत. चायनिज असल्याने ती आयात केलेली आहेत. साधारण ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान त्याची किंमत आहे. त्यातही क्वालिटी व स्तर असले तरी त्याने फार फरक पडत नाही. हाताला रॅश येत नाही किंवा रग लागत नाही, हे किंबहुना या कव्हरचे वैशिष्ट्य वाटते. अर्थात हा प्रत्येकाच्या शारिरीक स्थितीनुसार असणारा अनुभव असू शकतो.

Web Title: useful and easy silicon steeringcover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.