देशात नवीन मोटार कायदा लागू झाल्यानंतर वाहतुक नियम मोडल्यास कारवाई करत दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये केरळ मधील एका बस चालकाला वाहतुक पोलिसांनी नाही तर एका सामान्य महिलेने चुकीची अद्दल घडवली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये एक बसचालक चुकीच्या दिशेने येत असल्याचे दिसून येत आहे. बस चुकीच्या दिशेने येत असतानाच तिकडून एक महिला त्या रस्त्यावरुन स्कुटी चालवत येत आहे. मात्र त्या महिलेने चुकीच्या दिशेने येणाऱ्या बस चालकाला अद्दल घडवण्यासाठी आपली गाडी एकाच जागी थांबवली व जो पर्यत बस चालक योग्य दिशेने जात नाही तो पर्यत तिने गाडी एकाच जागी थांबवून ठेवली आहे.
दरम्यान महिलेने आपली गाडी एकाच जागी थांबवून ठेवल्यानंतर शेवटी त्या बस चालकाला बस योग्य दिशेने घेण्यास त्या महिलेने भाग पाडले. तसेच या महिलेने वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या बस चालकाला योग्य अद्दल घडविल्यामुळे सोशल मीडियावर त्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.