- सुवासित दत्तनवी दिल्लीः Volkswagen Ameo ही कार सर्वात आधी 2016मध्ये बाजारात दाखल झाली होती. तिचं पहिलं व्हर्जन पेट्रोल इंजिनचं होतं आणि नंतर तिचं डिझेल इंजिन मॉडेलही आलं होती. सब 4 मीटर सेडान सेग्मेंटमध्ये या कारचं ऑटोमॅटिक व्हर्जनही बाजारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारासाठी ही कार थोडी जुनी झाली असली, तरी या कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि तिची एकंदर कामगिरी जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. Volkswagen Ameo TDI ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकते का, हे आम्ही तपासून पाहिलं.Volkswagen Ameo ही कार Polo हॅचबॅकचं सेडान व्हर्जन आहे. Polo आणि Vento यांच्यातील दरी मिटवण्याच्या हेतूने ही कार कंपनीने तयार केली, बाजारात आणली. भारतीय कारप्रेमींच्या गरजा ओळखून ही कार तयार केल्याचा कंपनीचा दावा आहे. ती Made for India असल्याचं ते म्हणतात. डिझाइनचा विचार केल्यास, Ameo चं डिझेल व्हर्जन हे पेट्रोल व्हर्जनसारखंच आहे. समोरून ही कार 'शेम टू शेम' Polo सारखी दिसते. Volkswagen Ameo मध्ये स्मोक्ड हेडलॅम्प देण्यात आलाय. कारच्या पुढील बंपरवरील क्रोमचा वापर लक्षवेधी ठरतो आणि कार शाही दिसते. Ameo चं इंटिरिअरही अत्यंत नेटकं आहे. कारच्या केबिनचा दर्जा चांगला आहे. फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हीलमुळे ही कार आपल्याला स्पोर्टी फील देते. टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीममुळे आपलं काम सोपं होतं. ब्लू टूथ, टेलिफोनी, यूएसबी, AUX, एसडी कार्ड सपोर्ट, व्हॉइस कमांड आणि मिररलिंक या सुविधा कारमध्ये आहेत. मात्र, यात अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो हे फीचर्स नाहीत.रिअर एसी वेंट, इलेक्ट्रिकल अॅडजस्टेबल ORVM, हाइट अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील आणि फ्रंट आर्म रेस्टमुळे इतर कारच्या तुलनेत Ameo सरस ठरते. पण इंटिरिअर स्पेसचा विचार केल्यास मागच्या सीटवर बसणाऱ्यांची थोडी अडचण होऊ शकते. पुढची सीट आरामदायक आहे. पण, मागच्या बाजूला लेगरूम, थाय सपोर्ट आणि हेड रूम पुरेशी नाही. लांबचा प्रवास असल्यास तिसऱ्या प्रवाशाला अगदीच आखडून बसावं लागू शकतं. Volkswagen Ameo TDI मध्ये क्रूज कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रेन सेन्सिंग वायपर, वन टच अँटी पिंच पॉवर विंडो आणि क्लूड ग्लब बॉक्ससारखे फीचर्स आहेत. Volkswagen Ameo TDI DSG मध्ये 1.5 लीटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन आहे. Volkswagen Polo आणि Volkswagen Vento मध्येही याच इंजिनाचा वापर केला जातो. हे इंजिन 108 बीएचपी पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. त्यामुळे ही या सेग्मेंटमधील सगळ्यात पॉवरफुल्ल कार आहे. 7-स्पीड DSG किती उत्तम प्रकारे ट्यून केलंय हे कार चालवल्यावर लगेच कळतं. विशेष म्हणजे, भारतीयांसाठी कळीचा मुद्दा असलेला मायलेजचा निकषही ती पूर्ण करते. कारचा एकंदर परफॉर्मन्स आपल्याला खूश करेल. स्पोर्ट्स मोडच्या पर्यायामुळे तुम्ही ड्रायव्हिंगचा मनसोक्त आनंद लुटू शकता. या कारचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ही तिची सगळ्यात मोठी खासियत आहे. लोअर आरपीएममध्ये तुम्हाला काही उणिवा जाणवतील, पण 7-स्पीड DSG गिअरबॉक्स आपल्याला जराही निराश करणार नाही. कारमधील फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील दिसायला चांगलं आहे. कारचं स्टिअरिंग थोडं वजनदार आहे आणि सस्पेंशनही जड आहे.कारचं स्टेअरिंग थोडंसं जड असल्यानं गाडी रस्त्यावर पळवताना मज्जा येते. परंतु ट्रॅफिकमध्ये ही गाडी काहीशी त्रासदायक ठरू शकते. Volkswagen Ameoच्या सर्व प्रकारात एबीएस आणि ड्युअल एअरबॅगसारख्या सुविधांचाही समावेश आहे. तसेच कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलचं फीचर्स देण्यात आल्यानं तुम्हाला कार नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते. Volkswagen Ameoची टक्कर Maruti Suzuki DZire, Ford Figo Aspire, Hyundai Xcent, Tata Tigor आणि Honda Amaze बरोबर आहे. Volkswagen Ameo TDI AT, Comfortline Plus आणि Highline प्रकारातही उपलब्ध आहे. दिल्लीत Comfortline Plus प्रकारातल्या कारची किंमत ऑन रोड जवळपास 10.20 लाख रुपयांएवढी आहे. तर Volkswagen Ameoमधल्या Highline प्रकारातील कारची किंमत 11.11 लाख रुपयांच्या आसपास आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Volkswagenच्या गाड्या ओळखल्या जातात. Volkswagen Ameo TDI ही कार ग्राहकांच्या मागण्यांनुसार तयार करण्यात आली आहे. या कारचं डिझाइन आणि इंटीरिअर स्पेस इतर कारच्या तुलनेत कमी असला तरी परफॉर्मन्समध्ये ही गाडी जबरदस्त आहे. Volkswagen Ameo ऑटोमॅटिक गाडीतही 7 स्पीड DSGचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेजमध्ये ताळमेळ चांगला आला. त्यामुळे तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर Volkswagen Ameo ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.