थोडं थांबा! आज पुन्हा सुरु होणार Revolt RV400 चे बुकिंग; किंमतही कमी झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:45 PM2021-07-15T12:45:54+5:302021-07-15T12:49:50+5:30
Revolt RV400 Electric Bike Booking Reopen On July 15: Revolt Motors हरियाणामध्ये मानेसर प्लांटमध्ये बाईक निर्माण करते. VOLT (वाहन ऑनलाइन ट्रैकिंग) सुविधेद्वारे त्यांच्या बाईकची डिलिव्हरी देखील ट्रॅक करता येणार आहे. पहिल्या सेलमध्ये 50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली.
Revolt RV400 Electric Bike Booking Reopen On July 15: Revolt Motors (रिवोल्ट मोटर्स) ने आजपासून भारतात आपली लोकप्रिय झालेली RV400 इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग पुन्हा सुरु केली आहे. जर गेल्या वेळी तुम्ही ही बाईक बुक केली नाही, आणि इच्छा असेल तर आणखी एक संधी आली आहे. जाणून घ्या बुकिंगची प्रक्रिया... (Revolt RV400 electric bike bookings to reopen on 15th July for these six cities, how to book Revolt RV400)
गेल्या वेळी राहुल शर्मा यांच्या नेतृत्वात या बाईक निर्माता कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामुळे दोन तासांतच याची बुकिंग बंद करावी लागली होती. कंपनीने आज 15 जुलैपासून पुन्हा बुकिंग सुरु केली आहे.
कंपनीनं सहा शहरांसाठी बाईकचं बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात कंपनीनं मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांसाठी आपल्या या बाईकचं बुकिंग सुरू केलं होतं.
RV400 रिवोल्ट मोटर्स हे कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल आहे. कंपनीने या बाईकची किंमत 28,000 रुपयांनी कमी केली आहे. यामुळे आता याची किंमत 90,799 रुपये एक्स-शोरूम आहे. याआधी Revolt RV400 किंमत 1,18,999 रुपये होती. गुजरात सरकारने दिलेल्या ऑफरमुळे ही बाईक 87,000 रुपयांना मिळत आहे.
रिव्होल्ट कशी बुक कराल?
Revolt RV400 इलेक्ट्रीक बाईकच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. https://www.revoltmotors.com/ ही ती साईट आहे.
या वेबसाईटवर जाऊन प्री-रजिस्टर देखील करता येते. परंतू हा पर्याय 12 वाजेपर्यंत सुरु होता. आता या बाईकचे रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे.
Revolt Motors हरियाणामध्ये मानेसर प्लांटमध्ये बाईक निर्माण करते. VOLT (वाहन ऑनलाइन ट्रैकिंग) सुविधेद्वारे त्यांच्या बाईकची डिलिव्हरी देखील ट्रॅक करता येणार आहे. पहिल्या सेलमध्ये 50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली.