Asian Games 2018: पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक; 'सोनेरी इतिहासा'चं स्वप्न अधुरं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:55 PM2018-08-28T12:55:12+5:302018-08-28T13:58:27+5:30
Asian Games 2018: अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले. चायनीज तैपेईच्या ताय त्झु यिंगने 21-13, 21-16 अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. सिंधूला पुन्हा एकदा रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
मंगळवारच्या लढतीपूर्वी सिंधूची यिंगविरूद्घ जय-परायजयाची आकडेवारी 3-9 अशी आहे. चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुरुवातच आक्रमणाने केली. तिने दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-13 असा जिंकला. या गेममध्ये सिंधूने कमबॅक करण्याचे प्रयत्न केले, परंतु तिला नशीबाची साथ लाभली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय त्झु यिंने 11-7 अशी आघाडी घेतली होती. त्यात सातत्याने गुणांची भर घालताना तिने हा गेम घेतला.
In a heartbreak loss, #PVSindhu wins #TeamIndia it's first ever Silver in the Women's Singles Finals of the #AsianGames. Up against World No.1 #TaiTzuYing, Sindhu lost 13-21, 16-21 but has our respect and millions of hearts with her. #WellDone@Pvsindhu1 👏🥈🇮🇳#IAmTeamIndiapic.twitter.com/tcKb7kBPrE
— Team India (@ioaindia) August 28, 2018
दुसऱ्या गेममध्ये सिंधुकडून सुरेख खेळ झाला. पिछाडीवर पडूनही तिने कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. यिंगने हा गेम 21-16 असा जिंकून जेतेपद निश्चित केले. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.