जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकवून दिले. ही देदिप्यमान कामगिरी सायना नेहवालला करता आली नाही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही जकार्तामध्ये सिंधूपेक्षा सायनाची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसत आहे.
सायनाने पदक जिंकले. त्यानंतर चाहत्यांनी तिला आपल्याबरोबर फोटो काढण्याची विनंती केली. सायनानेही आपल्या चाहत्यांच्या विनंतीला मानदिला आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढले. सायनाने यावेळी तिरंगा हातात धरून तिच्या चाहत्यांसोबत फोटो काढले.
सायनासाठी जकार्ता खूप लकी आहे. २००९ मध्ये खेळताना तिने आपली पहिली सुपर सिरीज स्पर्धा इथेच जिंकली. त्यानंतर अनेक स्पर्धा जकार्तामध्ये खेळवल्या गेल्या आणि जकार्ताने तिला कधीच रित्या हाताने पाठवले नाही.