Asian Games 2018: जे कुणालाच नाही जमलं, ते सिंधूने करून दाखवलं; 'सोनेरी इतिहास' एका पावलावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:35 AM2018-08-27T11:35:12+5:302018-08-27T16:34:28+5:30

Asian Games 2018 LIVE Update: रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने आशियाई स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Asian Games 2018 Update : PV Sindhu enter into the women's singles final | Asian Games 2018: जे कुणालाच नाही जमलं, ते सिंधूने करून दाखवलं; 'सोनेरी इतिहास' एका पावलावर!

Asian Games 2018: जे कुणालाच नाही जमलं, ते सिंधूने करून दाखवलं; 'सोनेरी इतिहास' एका पावलावर!

googlenewsNext

जकार्ता - रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूनेआशियाई स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.



 

# सिंधूने 15-8 अशी आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमणासमोर यामागुची हतबल दिसत होती.



 

# नर्व्हस तिसऱ्या गेममध्ये सामना जाऊनही सिंधूने दडपण घेतले नाही. तिने जपानी खेळाडूला तोडीसतोड उत्तर दिले. तिच्या खेळासमोर यामागुचीचे मनोबल खचले आणि तिच्याकडून चुका होऊ लागल्या. त्याचा फायदा उचलत सिंधूने 10-5 अशी आघाडी घेतली.



 

 

# यामागूचीने दुसरा गेम 21-16 असा घेत सामन्यातील आव्हान कायम राखले

# दुसऱ्या गेममध्येही सिंधूने दमदार खेळ कायम राखला. तिने आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना सुरुवातीलाच आघाडी घेतली. मात्र, 6-10 अशा पिछाडीवर असूनही यामागुचीने गेम 10-10 असा बरोबरीत आणला. यामागुचीने त्यानंतर 15-12 अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण वाढवले. 



 

#यामागुचीच्या स्मॅशला सिंधू तितक्याच खुबीने उत्तर देत होती. सिंधूने पहिला गेम 21-17 असा घेत अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली. सिंधूने दोन गेमपॉइंट वाया घालवले.

 

#रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने पहिल्या गेममध्ये चुरशीचा खेळ केला. सिंधूने क्रॉस शॉट्स आणि नेट प्लेसिंगचा खेळ करताना जपानी खेळाडूवर सातत्याने दडपण निर्माण केले. सिंधूच्या जोरदार स्मॅशसमोर यामागुचीचे प्रयत्न खुजे पडत होते. 



 

जकार्ता -  सायना नेहवालच्या पराभवानंतर आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत भारतीयांच्या नजरा पी. व्ही. सिंधूवर लागल्या आहेत. उपांत्य फेरीत तिच्यासमोर जपानच्या अकाने यामागुचीचे आव्हान आहे. 



 

भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदाच्या वर्षांत सिंधू आणि यामागुची पाचवेळा समोरासमोर आल्या आणि त्यात भारतीय खेळाडूने तीन वेळा बाजी मारली आहे. 

Web Title: Asian Games 2018 Update : PV Sindhu enter into the women's singles final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.