- आकाश नेवेप्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात भावंडांचा देखील समावेश आहे. स्पर्धेत समीर वर्मा आणि सौरभ वर्मा यासोबतच, बल्गेरियाच्या स्टोईवा बहिणींचा समावेश आहे. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या वर्मा भावंडांचा दृष्टिकोन यास्पर्धेबाबत तसा स्पष्ट आहे. एकमेकांना नेहमीच सांभाळून घेणारे हे दोन्ही भाऊ कोर्टवर उतरल्यावर फक्त आपल्या संघासाठी खेळतात. धाकटा समीर आणि थोरला सौरभ यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. अहमदाबाद स्मॅश मास्टरस्कडून खेळणाऱ्या सौरभ याने या स्पर्धेतील आपला अखेरचा सामना देखील जिंकला आहे. तर समीर मुंबई रॉकेट्सकडून खेळत आहे. अहमदाबाद स्मॅश मास्टरसकडून खेळणाऱ्या स्टिफनी आणि गॅब्रिएला बहिणींना एकमेकांसोबत सराव आवड आहे. सरावातील त्यांच्या अडचणी त्यामुळे दूर होतात, असे त्यांना वाटते. स्टिवोनी बहिणी बल्गेरियातून भारतात बॅडमिंटन खेळण्यासाठी आल्या आहेत. स्टिवोनी बहिणींनी युरोपियन स्पर्धेतील अनेक विजेतेपद एकमेकांच्या साथीने पटकावली आहे. त्याकधीही एकमेकींविरोधात खेळलेल्या नाहीत.आम्ही एरवी एकमेकांना पुरक असतो. मात्र खेळाचा विचार आधी असतो. त्यामुळे एकमेकांविरोधात खेळताना कधीच अडचण जाणवणार नाही. -सौरभ वर्माआम्ही नेहमीच एकमेकींना समजून घेतो. सराव एकत्र करतो. एकमेकांच्या विरोधात देखील जोमाने खेळू शकतो. खेळ भावना ही महत्त्वाची असते.- स्टिफनी स्टोईवा
बॅडमिंटन लीगमध्ये ब्रदर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 5:55 PM