डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली. तैपेईच्या ताय त्झु यिंगने सायनाला पराभूत केले आणि डेन्मार्क स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सलग अकरा सामन्यांत यिंगने सायनावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला.
सायनाने दुसऱ्या गेममध्ये अगदी सावध खेळावर भर दिला. तिने यिंगच्या प्रत्येक खेळाचा अभ्यास करताना 5-2 अशी आघाडी घेतली, परंतु यिंगने जोरदार कमबॅक केला. सायनाचे फटके परतवताना यिंगने अनेकदा कॉक सोडण्यावर भर दिला. पण तिचे अंदाज चुकले. सायनाने त्याचाच फायदा घेत 10-5 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर सायनाने खेळ उंचावताना सामन्यावर पकड घेतली. प्रत्येक गुणासोबत तिची जिंकण्याची जिद्द वाढताना दिसत होती. सायनाने हा गेम 21-13 असा घेत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
- सायनाने 21 ऑक्टोबर 2012 मध्ये पहिले आणि एकमेव डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
- सायना आणि ताय त्झु यिंग यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांत तैपेईच्या खेळाडूचे पारडे जड आहे. यिंगने 12 वेळा सायनाला पराभूत केले आहे, तर सायनाला केवळ पाच विजय मिळवता आलेले आहेत.
- सायनाने 2013 मध्ये यिंगवर अखेरचा विजय मिळवला होता. स्वीस ओपन स्पर्धेत सायनाने 21-11, 21-12 अशी बाजी मारली होती, त्यानंतर सलग दहा सामन्यांत यिंगविरुद्ध सायनाची विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.