यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:12 AM2017-11-03T03:12:28+5:302017-11-03T03:12:37+5:30

जेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या महाराष्ट्र संघाचे आव्हान ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक फेरीत पहिल्या दिवशी संपुष्टात आले.

Hosts end Maharashtra's challenge; Petroleum Board The final match of the team is between the state | यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत

यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत

Next

नागपूर : जेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या महाराष्ट्र संघाचे आव्हान ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक फेरीत पहिल्या दिवशी संपुष्टात आले.
कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली सुरू झालेल्या या स्पर्धेत गुरुवारी उपांत्य सामन्यात महाराष्ट्रा संघ गतविजेत्या पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड (पीएसपीबी) संघाकडून १-३ ने पराभूत झाला. दुसºया उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने मणिपूरवर ३-१ असा विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना आज शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून पीएसपीबी-मध्य प्रदेश असा रंगणार आहे.
सकाळच्या सत्रात उत्तर प्रदेशवर ३-२ असा विजय नोंदविणाºया महाराष्टÑ संघाला पीएसपीबीविरुद्ध सुरुवातीपासून पराभवाचा धक्का बसला. कर्णधार अक्षय देवाळकर- संजना संतोष ही जोडी मिश्र दुहेरीत मनू अत्री- सिक्की रेड्डी यांच्याकडून १६-२१, १४-२१ ने पराभूत झाली. पण कौशल धर्मामेर याने पुरुष एकेरीत गुरुसाईदत्त याच्यावर २१-१४, २०-२२, २१-११ ने विजय नोंदवीत लढत बरोबरीत आणली होती. महिला एकेरीत ऋत्त्विका शिवानीने नेहा पंडितचा पराभव करताच यजमान संघ माघारला. मनू अत्री-प्रणव जेरी चोप्रा यांनी अक्षय देवाळकर-प्रसाद शेट्टी यांच्यावर २१-१३, २१-९ असा विजय नोंदवित अंतिम फेरीचा मार्ग मोकळा केला. उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्टÑ संघाने उत्तर प्रदेशवर चमकदार विजय नोंदविला होता. यात नागपूरची खेळाडू वैष्णवी भाले हिने नोंदविलेला विजय निर्णायक ठरला. उत्तर प्रदेशची अमोलिका सिंग हिने महाराष्ट्राची नेहा पंडित हिच्यावर चमकदार विजय नोंदवत लक्ष वेधले. याशिवाय गतउपविजेता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी (एएआय) संघाला मध्य प्रदेशकडून सलामीलाच पराभवाचा धक्का बसला.

बॅडमिंटन निकाल
उपांत्य फेरी :- पीएसपीबी मात महाराष्ट्र ३-१ (मनू अत्री-सिक्की रेड्डी एन. मात अक्षय देवाळकर-संजना संतोष २१-१६, २१-१४), गुरुसाईदत्त आर.एम.व्ही. पराभूत विरुद्ध कौशल धर्मामेर १४-२१, २२-२०, ११-२१, रुत्विका शिवानी जी. मात नेहा पंडित २१-१२, २१-१५, मनू अत्री-प्रणव जेरी चोप्रा मात अक्षय देवाळकर-प्रसाद शेट्टी २१-१३, २१-९). मणिपूर पराभूत मध्य प्रदेश १-३ (डी.सिंग -पूर्णिमा देवी एन. पराभूत विरुद्ध खुशबू पटेल-शुभम प्रजापती २१-१९, १९-२१, १६-२१, एम. मैरबा मात शुभम प्रजापती २१-१२, २०-२२, २१-१८, अंगीता नौरेम पराभूत विरुद्ध श्रीयांशी परदेशी ४-२१, ५-२१, मंजित सिंग के- डी.सिंग पराभूत विरुद्ध आलाप मिश्रा-अभिमन्यू सिंग १६-२१, २०-२२).

Web Title: Hosts end Maharashtra's challenge; Petroleum Board The final match of the team is between the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton