नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर पोहोचला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही क्रमवारी जाहीर केली. २४ वर्षांचा श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने २0१७ साल सुरूझाल्यापासून आतापर्यंत चार सुपर सीरिज स्पर्धांचीजेतेपद पटकावली आहेत. श्रीकांतने ७३,४0३ गुणांसह दुसºया स्थानावर झेप घेतली.भारताच्या कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुरुष एकेरीत विक्टॉर अॅक्सलसेन पहिल्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने दुसºया स्थानावर आणि सायना नेहवाल ११ व्या स्थानावर कायम आहे.श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपद पटकावली आहेत. वर्षभरात इतकी विजेतेपद मिळवणारा श्रीकांत भारताचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बी.साई प्रणीतने श्रीकांतचा पराभव केला होता. सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बॅडमिंटनपटू समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.ठळक मुद्देएचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपदे पटकावली आहेत.
किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:09 AM