वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मोमोताला सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:20 AM2018-08-06T04:20:49+5:302018-08-06T04:21:01+5:30
केंटो मोमोता जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकवणारा आज पहिला जपानचा पुरुष खेळाडू ठरला आहे.
नानजिंग : केंटो मोमोता जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकवणारा आज पहिला जपानचा पुरुष खेळाडू ठरला आहे. या २३ वर्षीय खेळाडूने अंतिम सामन्यात चीनचा उदयोन्मुख खेळाडू शी युकी याचा २१-११, २१-१३ असा पराभव केला.
मोमोता कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वादात भोवऱ्यात अडकला होता. तेव्हा २०१६ मध्ये जपानच्या बॅडमिंटन संघटनेच्या प्रमुखाने त्याला बेकायदेशीर कॅसिनोत गेला म्हणून एका वर्षासाठी निलंबित केले होते. याच कारणामुळे मोमोता हा रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळू शकला नव्हता. मोमोता तेव्हा जागतिक क्रमवारीत दुसºया क्रमांकाचा खेळाडू होता. या बंदीनंतर त्याने त्याच्या खेळावर मेहनत घेतली आणि सुरेख पुनरागमन केले. आता तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. (वृत्तसंस्था)