मुंबई : क्रमवारीमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचा अधिक फायदा होईल. कारण यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला कसलेल्या आणि बलाढ्य खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत नाही, असे मत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा शटलर एच. एस. प्रणॉय याने म्हटले. कारकिर्दीतील एका स्तरावर पोहचल्यानंतर प्रत्येक खेळाडूचे लक्ष मोठ्या स्पर्धा जिंकण्यावर असते, असेही प्रणॉय म्हणाला.आगामी पीबीएल स्पर्धेसाठी अहमदाबाद स्मॅश मास्टर्स संघाचे नेतृत्व प्रणॉयकडे सोपविण्यात आल्याची घोषणा मुंबईत करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रणॉयने म्हटले की, ‘कारकिर्दीमध्ये एक स्तर गाठल्यानंतर खेळाडू रँकिंग ऐवजी स्पर्धा जिंकण्यावर अधिक भर देतो. परंतु, हे अनेकदा रँकिंगवर अवलंबून असते.’‘मोठ्या स्पर्धेत सोपा ड्रा पाहिजे असेल्यास अव्वल १० स्थानांमध्ये असणे आवश्यक असते. जेव्हा असे होत नाही, तेव्हा पहिल्या किंवा दुसºया फेरीत बलाढ्य खेळाडूविरुद्ध खेळावे लागते. रँकिंग महत्त्वपूर्ण आहे, परंतु सर्वकाही नक्कीच नाही,’ असेही प्रणॉय म्हणाला.
मानांकनामुळे सोपा ड्रॉ मिळतो - प्रणॉय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:34 AM