पॅरिस : गतविजेता किदाम्बी श्रीकांत, पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल मंगळवारपासून सुरु होत असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटनमध्ये यंदाच्या मोसमातील पहिले बीडब्ल्यूएफ जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहेत.जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सायनाने डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण रविवारी तिला अंतिम लढतीत अव्वल मानांकित ताय त्झू यिंगविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरी गाठणाऱ्या श्रीकांतलाही फ्रेंच ओपनच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नाही. श्रीकांतला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या वोंग विंग की विन्सेंटविरुद्ध खेळेल तर सायनाची लढत ३७ वे मानांकन असलेल्या साएना कावाकामीसोबत होणार आहे.जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावरील खेळाडू सिंधूला ओडेन्सेमध्ये पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सिंधूला सलामीला ११ वे मानांकन असलेल्या बेइवेन झांगविरुद्ध खेळावे लागेल.>ताय, मोमोटा दावेदारअश्विनी पोनप्पा व सात्विक साईराज रांकीरेड्डी मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान सांभाळतील. या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर स्पर्धेत ताय जू व केंटो मोमोटा पुन्हा एकदा जेतेपदाचे प्रबळ दावेदार राहतील.
सायना, सिंधू वर्चस्व गाजवण्यास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:14 AM