हैदराबाद : भारताचा आघाडीचा खेळाडू समीर वर्माने पुरुष एकेरीत आपल्या देशाच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तचा २-१ गेममध्ये पराभव करून हैदराबाद ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित समीरने ७५ हजार डॉलर्स पुरस्काराच्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत बिगर मानांकित गुरुसाईदत्तला ५१ मिनिटात्ां १६-२१, २१-१५, २१-११ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.रविवारी विजेतेपदासाठी त्याची लढत मलेशियाच्या सूंग जू वेनविरुद्ध होईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सूंग जू वेनने सातवा मानांकित इंडोनेशियाचा फिरमान अब्दुल खोलिकला २१-१७, २१-१४ गुणांनी नमविले.
गुरुसाईदत्तला पराभूत करून समीर वर्मा अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:54 AM