जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 07:50 PM2018-08-04T19:50:34+5:302018-08-04T19:51:38+5:30
भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
नानजिंग (चीन) : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची या खेळाडूवर 21-16, 24-22 असा विजय मिळवला.
World number 3 @Pvsindhu1 beats world number 2 Akane Yamaguchi of Japan in straight sets 21-16, 24-22 in the semi-finals of the BWF World Championships in Nanjing. And set up a Clash against @CarolinaMarin In the finals of World Championships. 2nd consecutive finals for Sindhu. pic.twitter.com/vzDBLiGUdA
— INDIAN sports news (@Bholush1997News) August 4, 2018
सिंधू आणि यामागुची यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पहिल्या गेममध्ये सिंधूने आक्रमक खेळ केला आणि हा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर सिंधू आत्मविश्वास उंचावेल आणि ती दुसरा गेम सहज जिंकेल असे वाटत होते. पण दुसऱ्या गेममध्ये यामागुची दमदार पुनरागमन केले. या गेममध्ये दोघींची 22-22 अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर सिंधूने सलग दोन गुण पटकावले आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
She is the proud of the nation! 🇮🇳#GoForGold champion 👍 https://t.co/Y7FiZqjZOz
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 4, 2018