Hair care tips: सगळ्यांनाच असं वाटत असतं की, त्यांचे केस लांब, मजबूत आणि चमकदार असावेत. मात्र, चुकीची लाइफस्टाईल, स्ट्रेस, धूळ-माती आणि प्रदूषणामुळे आजकाल सगळ्यात जास्त इफेक्ट केसांवर पडतो आणि केस कमजोर होऊन तुटू लागतात. ही समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही होते. अशात लोक या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही केसगळतीची समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊ केस मजबूत करण्यासाठी कोणत्या फूड्सचं सेवन करावं.
बदामाचे लाडू
हिवाळ्यात ड्राय फ्रूट्सचे लाडू भरपूर लोक खातात. अशात बदाम भाजून त्यांचं पावडर तयार करा. त्यात तूप आणि गूळ मिक्स करून लाडू तयार करा. रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळतं. ज्यामुळे केस मजबूत होतात.
अळशीच्या भाजलेल्या बीया
अळशीच्या बियांमध्ये आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन भरपूर असतात. याचं सेवन केल्याने केसांची वाढ होते आणि मॅग्नेशिअमने केसगळती रोखली जाते. यासाठी अळशीच्या बीया भाजून घ्या आणि सकाळी यांचं सेवन करा.
रताळे
रताळ्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर असतं. या दोन्ही तत्वांमुळे केस मजबूत होतात. अशात तुम्ही उकडलेल्या रताळ्यांचं सेवन करा किंवा रताळ्याचे वेगवेगळे पदार्थही खाऊ शकता.
सोयाबीन
सोयाबीनचं वेगवेगळ्या प्रकारे सेवन केलं जातं. त्यात सोया चंक्सपासून ते सोया पनीर किंवा सोया मिल्कसारख्या गोष्टींचा समावेश असतो. यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश केल्याने भरपूर प्रोटीन मिळतं आणि केसांची मूळं मजबूत होतात.
भाजलेले मखाने
मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं. जे केसांची मजबूती आणि वाढीसाठी महत्वाचं असतं. अशात तुम्ही मुठभर मखाने थोड्या तुपात भाजून, त्यात थोडं काळं मीठ आणि काळी मिरी पाडवर टाकून सकाळी सेवन करू शकता. यांचं सेवन तुम्ही नाश्त्याच्या रूपातही करू शकता. याने केस मजबूत होतील आणि लांबही होतील.