शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे नखंही घेतात श्वास; वाचा काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:56 PM2018-07-17T13:56:19+5:302018-07-17T14:02:54+5:30
काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात मोठ्या नखांचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या भारताच्या श्रीधर लाल यांनी आपली नखं कापली. त्यांनी ६६ वर्षांनंतर आपल्या हाताची नखं कापली.
काही दिवसांपूर्वीच जगात सर्वात मोठ्या नखांचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या भारताच्या श्रीधर लाल यांनी आपली नखं कापली. त्यांनी ६६ वर्षांनंतर आपल्या हाताची नखं कापली असून कापण्याआधी जेव्हा त्यांच्या नखांची लांबी मोजण्यात आली होती त्यावेळी त्यांची लांबी 909 सेमी. इतकी होती. त्यांनी आपल्या उजव्या हाताचीच नखं वाढवली होती. जेणे करून डाव्या हाताने ते आपली कामे सहज करू शकतील. पण तुम्हाला एक गोष्ट नक्कीच माहीत नसेल की, डाव्या हाताची नखं उजव्या हाताच्या नखांपेक्षा वेगानं वाढतात. हाताच्या बोटांची नखं दरमहिन्याला ३.५ मीलीमीटरने वाढतात. तर पायांच्या बोटांची नखं दरमहिन्याला फक्त १.६ मीलीमीटर वाढतात. नखांबाबतच्या अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टींबाबत जाणून घेऊयात...
1. नखांना घाम येत नाही
आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना घाम येतो, परंतु नखांना कधीच घाम येत नाही. हे संशोधनातूनही सिद्ध झाले आहे.
2. महिलांच्या तुलनेत पुरूषांची नखं अधिक वेगाने वाढतात
महिला आपली नखं आणि केसांवर अधिक प्रेम करतात. त्यांना नखं वाढवण्याचीही आवड असते. एका अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरूषांची नखं अधिक वेगाने वढतात.
3. तुमची नखंही घेतात श्वास
जर तुम्ही तुमच्या नखांवर नेलपॉलिश लावत असाल तर थोडा विचार करा. कारण असे केल्याने तुमच्या नखांचे आरोग्य बिघडू शकते. नखंही ऑक्सिजन घेतात. नखांवर नेलपॉलिश लावल्यानं नखांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे तुमची नखं कमकुवत होतात आणि त्यांचे आरोग्य बिघडते.
4. तणावामुळे नखांची वाढ खुंटते
जर तुम्ही तणावामध्ये असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरासोबतच तुमच्या नखांवरही होत असतो. कारण तणाव आणि अपुरी झोप यांमुळे तुमच्या शरिराची पोषक तत्वे नखांपासून दूर जातात. त्यामुळे नखं कमकुवत होऊन त्यांची वाढ खुंटते.
5. नखं तुमच्या आरोग्याचा आरसा असतात
नखांचा आकार आणि त्यांचा रंग यावरून तुम्ही तुमच्या आरोग्याची स्थितीही माहीत करून घेऊ शकता. डॉक्टर तुमची नखं पाहून सांगू शकतात की, तुम्ही सुदृढ आहात की नाही. जसे तुमच्या नखांचा रंग निळा झाला तर तुम्हाला फुफ्फुसांचा आजार असल्याचे स्पष्ट होते.