घाम जाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 04:22 PM2018-04-10T16:22:57+5:302018-04-10T16:22:57+5:30
व्यायाम करून आलेला किंवा स्टिम बाथ घेऊन आलेला घाम शरिरासाठी खूप चांगला मानला जातो. चला जाणून घेऊया घाम जाण्याचे 8 फायदे...
शरिरातून जास्त घाम गेल्याने अनेकांना त्रास होतो. अनेकांना याचा वैताग आलेला असतो पण शरिरातून घाम जाणे हे अधिक आरोग्यदायी असतं. घाम गेल्याने शरिरातील टॉक्सिन बाहेर येतात ज्याने शरिरात अनेक हेल्थ प्रॉब्लेम दूर होतात. व्यायाम करून आलेला किंवा स्टिम बाथ घेऊन आलेला घाम शरिरासाठी खूप चांगला मानला जातो. चला जाणून घेऊया घाम जाण्याचे 8 फायदे...
१) घाम निघाल्याने शरिरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यात मोठी मदत होते.
२) घाम निघाल्याने शरिरातील घाण निघून जाते. यामुळे स्कीनवरील छीद्र मोकळे होता, त्याने स्कीन साफ होण्यास मदत होते. तुमची स्कीन आणखी तजेलदार आणि स्वच्छ दिसते.
३) घाम गेल्याने डेड सेल्सचा खात्मा होतो आणि चेहरा अधिक चमकतो.
४) शरिरातून घाम गेल्याने आपण जास्तीत जास्त पाणी पितो. यामुळे किडनीतील घाण साफ होते आणि किडनी स्टोन धोका मोठ्या प्रमाणात टळतो.
५) घाम गेल्याने शरिराचं तापमान मेंटेन होतं. यामुळे मेंदुला आराम मिळतो आणि त्यामुळे तुमचा ट्रेस दूर होतो.
६) घामासोबत शरिरातून सोडियम आणि पोटॅशिअल सुद्धा बाहेर पडतं. त्यामुळे शरिरात केमिकलचंही संतुलन राहतं.
७) घाम जात असल्याने स्किनला जास्त रक्ताची गरज भासते. त्यामुळे शरिरातील रक्त प्रवाह आणखी चांगला होतो.
८) जास्तीत जास्त घाम गेल्याने शरिरातील घाण साफ होते. यामुळे पिम्पल्सची समस्याही दूर होते, कंट्रोल होते.