Skin Care Tips: हेल्दी, ग्लोइंग त्वचेसाठी ७ सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 10:16 AM2018-09-08T10:16:48+5:302018-09-08T10:18:34+5:30

काही सोप्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी चमकदार त्वचा मिळवू शकता. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व टिप्स नैसर्गिक आहेत.

7 Easy and simple ways to get glowing skin naturally | Skin Care Tips: हेल्दी, ग्लोइंग त्वचेसाठी ७ सोप्या टिप्स!

Skin Care Tips: हेल्दी, ग्लोइंग त्वचेसाठी ७ सोप्या टिप्स!

ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी अनेक महिला प्रत्येक १५ दिवसांनी पार्लरमध्ये जातात. आणि आपल्या खर्चात भर घालतात. पण हा पार्लरचा नेहमीचा खर्च तुम्हाला वाचवता येऊ शकतो. काही सोप्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी चमकदार त्वचा मिळवू शकता. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व टिप्स नैसर्गिक आहेत.

१) कोमट पाण्यात लिंबू

रोज सकाळी उठल्यावर सर्वातआधी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यावे. या पाण्याने शरीरातील पीएच लेव्हल नियंत्रणात राहते. पनचक्रियाही चांगली होते, तसेच मेटाबॉलिज्मही कंट्रोलमध्ये राहतं. आणि याचा पॉझिटीव्ह परिणाम चेहऱ्यावर दिसतो. दिवसा त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसायला लागतो.

२) क्लींज, टोन, मॉइस्चराइज

या तीन स्टेप तुमच्या रुटीनमध्ये असायला हव्यात. दिवसा एकदा, रात्री झोपण्यापूर्वी या तीन स्टेप्स आवर्जून फॉलो करा. असे केल्याने त्वचेचे पोषक तत्व कायम राहतात. 

३) फेस पॅक

त्वचेच्या प्रकारानुसार फेस पॅकचा वापर करा. तुमची त्वचा तेलकट आहे, ड्राय किंवा कॉम्बिनेशन हे तपासून मग फेस पॅक वापरा. आठवड्यातून कमीत कमी एकदा नैसर्गिक फेस पॅकचा वापर करावा.

४) सीरम

मार्केटमध्ये अनेकप्रकारची सीरम उपलब्ध आहेत. यातील तुमच्या त्वचेनुसार सीरमची निवड करुन वापरा. जर तुमची त्वचा जास्त संवेदनशील असेल तर तुम्ही क्रिमी सीरम वापरु शकता.

५) सनस्क्रीन विसरु नका

गरमीचे दिवस असो वा थंडीचे उन्हात बाहेर येण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा. जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर त्याआधी सनस्क्रीन आवर्जून लावा आणि त्यानंतर मेकअप करा. 

६) प्रायमर

शक्य असेल तर मेकअप केल्यावर प्रायमरचा वापर करा. हे प्रायमर सुद्धा त्वचेचा टोन आणि प्रकारानुसार निवडा. 

७) स्क्रब

त्वचेसाठी स्क्रबिंग फार गरजेची असते, पण हे लक्षात ठेवा की स्क्रब त्वचेच्या प्रकारानुसार असावं. ते अधिक हार्श असू नये. आठवड्यातून कमीत कमी एकदा स्क्रबचा वापर करावा. 
 

Web Title: 7 Easy and simple ways to get glowing skin naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.