हळूहळू वातावरणातील गारवा वाढत असून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. थंडीमध्ये आपल्या आरोग्यासोबतच त्वचेचीदेखील काळजी घेणं गरजेचं असतं. थंडीमध्ये वातावरणातील गारव्यामुळे त्वचा शुष्क होते त्यामुळे ती मुलायम ठेवण्यासाठी अनेकदा मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. परंतु अनेकांना मॉयश्चरायझरचा योग्य वापर कसा करावा याबाबत माहीती नसते.
मॉयश्चरायझर नेमकं कुठे लावावं? कसं लावावं? किंवा बाजारातून विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांच्याबाबत व्यवस्थित माहीती करून घेणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त कोणत्या त्वचेसाठी कोणंत मॉयश्चरायझर वापरावं याबाबतही माहिती करून घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात अशा गोष्टींबाबत ज्या मॉयश्चरायझरचा वापर करताना लक्षात घेणं गरजेचं असतं.
मॉयश्चरायझरचा वापर करताना अशी घ्या काळजी :
- त्वचेची कोणतीही समस्या ठिक करण्यासाठी सर्वात आधी ब्युटी प्रोडक्ट्सची योग्य निवड करणं आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्तीचा स्किन टाइप वेगळा असतो. त्यामुळे सर्वात आधी तुमचा स्किन टाइप जाणून घ्या त्यानुसारच मॉयश्चरायझरचा वापर करा.
- जर तुमची त्वचा ऑयली असेल तर तुम्ही ऑइल फ्री किंवा सामान्य मॉयश्चरायझरचा वापर करा. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर ऑइल बेस्ड मॉयश्चरायझरचा वापर करा.
- मॉयश्चरायझर त्वचेला नेमकं कधी लावावं हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्युटी एक्सपर्ट्सनुसार जेव्हा तुम्ही त्वचा स्वच्छ कराल. म्हणजेच आंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा स्वच्छ धुतल्यानंतरच या मॉयश्चरायझरचा वापर करणं फायदेशीर ठरतं. चेहरा स्वच्छ धुतल्याशिवाय मॉयश्चरायझर लावणं अनेकदा नुकसानदायक ठरू शकतं.
- त्वचेवरील घाण स्वच्छ केल्याशिवाय चुकूनही मॉयश्चरायझरचा वापर करू नका. असे केल्यास त्वचेवरील घाण, मळ पोर्समध्ये जाण्याची शक्यता असते. आणि चेहऱ्यावर मुरमं आणि पिंपल्सची समस्या होते.
- मॉयश्चरायझर लावताना हाताच्या बोटांच्या सहाय्याने डॉट्सच्या स्वरूपात लावा. त्यानंतर गोलाकार मसाज करत संपूर्ण त्वचेवर पसरवून घ्या. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
- मॉयश्चरायझरमध्ये एसपीएफ प्रॉपर्टी असतील तर ते त्वचेसाठी फायदेशी ठरेल. त्यामुळे सन प्रोटेक्शन मिळण्यास मदत होईल.
- मॉयश्चरायझर फक्त चेहऱ्यावरच न लावता ते हात, पाय आणि मानेवरही लावा.