हाता-पायांचेही सौंदर्य खुलवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 06:11 PM2016-11-23T18:11:40+5:302016-11-23T18:11:40+5:30
आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्या सौंदर्यावर अवलंबून असते. यासाठी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सर्वचजण अगदी मनापासून प्रयत्नही करतात.
Next
आ ले व्यक्तिमत्त्व हे आपल्या सौंदर्यावर अवलंबून असते. यासाठी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सर्वचजण अगदी मनापासून प्रयत्नही करतात. विशेषत: सुंदर दिसण्यासाठी आपण जास्त काळजी चेहऱ्याचीच घेत असतो आणि हाता-पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करीत असतो. सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच महत्त्वाचा नसून, इतर गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. या काही घरगुती टिप्सनी तुमचे हात-पाय नक्कीच सुंदर दिसतील....
बऱ्याचदा आपल्या हाता-पायांच्या कोपºयांना काळेपणा आलेला असतो. त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. यासाठी लिंबाचा रस कोपर व गुडघ्यांना चोळल्याने तिथल्या मृत पेशी निघून जातात आणि काळेपणा नाहीसा होतो. काळवंडलेल्या हातांचा काळेपणा घालवण्यासाठी बेसनाचे पीठ दुधात मिक्स करा. ही पेस्ट हातांना लावून मसाज करा. पपईचा गर चोळल्यानेही काळेपणा कमी होऊ शकतो. थंडीच्या दिवसात हाता-पायांना लवंगतेल, बदामतेल, कोल्डक्रीमने मसाज केल्यास त्यांचा मऊपणा टिकून राहतो.
आठवड्यातून किमान दोनदा सौम्य शाम्पू गरम पाण्यात टाकून त्यात १० मिनिटे पाय ठेवावेत. नंतर पाय स्वच्छ पुसून साय व हळदीने तळव्याला मसाज करावा. यामुळे भेगांचे प्रमाण कमी होऊन पायांचे सौंदर्यही वाढते. पायाना भेगा असल्यास ग्लिसरीन व लिंबूरसाचे मिश्रण रात्री लावल्यानेही चांगला फायदा होतो. नखांना पुरेसे पोषण न मिळाल्याने ती तुटतात. ती मजबूत व्हावीत याकरता ग्लिसरिन, मध, लवंगतेल यांच्या मिश्रणात नखे भिजवावीत. नखांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना कॅल्शिअमची आवश्यकता असते. त्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लिंबू चोळण्याने नखांना चमक येते.