हिवाळा लागला की त्वचेच्या समस्यांसोबतच केसांचीही समस्या डोकं वर काढते. हिवाळ्यात डॅंड्रफची समस्या वाढते आणि यामुळे केसगळतीही होऊ लागते. काही लोकांना थंडीत केसांची समस्या फार जास्त होते. इतकी की, डॅंड्रफ त्यांच्या कपड्यांवर आणि केसांमध्ये स्पष्टपणे दिसू लागतो. अशात तेलाने मसाज केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि या समस्येपासून सुटका करुन घेऊ शकता.
केसांची करा मालिश
या हिवाळ्यात जर तुम्हाला केस मजबूत आणि डॅंड्रफ फ्री ठेवायचे असतील तर आठवड्यातून कमीत कमी तीनवेळा डोक्याची मसाज करा. घरीच तुम्हाला सूट होईल त्या तेलाने मसाज केल्यास अधिक फायदा होईल. याने तुमचे पार्लरचे पैसे वाचतील.
मसाज करण्यासाठी कोणतही तुम्ही वापरता ते तेल घ्या. हे तेल बोटांच्या मदतीने डोक्याच्या त्वचेला आणि केसांना लावा. आता हळूहळू मसाज करा. याने डोक्याच्या त्वचेत ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि डोक्याच्या त्वचेची बंद झालेली छिद्रेही मोकळी होतात.
केस धुण्याआधी लावा तेल
जास्तीत जास्त लोक झोपण्याआधी तेल लावून सकाळी केस धुतात. पण आंघोळ करण्याआधी तेल लावणे अधिक चांगले मानले जाते. केसांना तेल लावण्यासाठी आणि मसाज करण्यासाठी खोबऱ्याचं तेल, सरसुचं तेल किंवा कोणतही हर्बल तेल वापरु शकता. तुम्ही बदामाच्या किंवा आवळ्याच्या तेलात कोणतही दुसरं तेल मिश्रित करु शकता. याने तुमचं केस मजबूत होतील आणि डॅड्रफही दूर होईल.
तसे तर तुम्ही तुम्हाला हवं ते तेल वापरू शकता. पण वर्जिन ऑईल खास मानलं जातं. हे तेल जितकं जास्त प्रोसेस्ड असेल तितके त्यातून व्हिटॅमिन्स आणि मायक्रो-न्यूट्रिंट्स मिळतात.