हिवाळ्यात चेहऱ्यावर रोज रात्री लावा 'हे' तेल, काही दिवसात दूर होतील डाग अन् चमकेल त्वचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:08 PM2024-11-21T13:08:39+5:302024-11-21T13:12:45+5:30

Coconut Oil In Winter : त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा इतर उत्पादनांचा वापर करण्याऐवजी एक नॅचरल उपाय करू शकता. तो म्हणजे खोबऱ्याचं तेल.

Coconut Oil In Winter : Use coconut oil on face daily for instant glow | हिवाळ्यात चेहऱ्यावर रोज रात्री लावा 'हे' तेल, काही दिवसात दूर होतील डाग अन् चमकेल त्वचा!

हिवाळ्यात चेहऱ्यावर रोज रात्री लावा 'हे' तेल, काही दिवसात दूर होतील डाग अन् चमकेल त्वचा!

Coconut Oil In Winter : थंडीला आता बऱ्यापैकी सुरूवात झाली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी भरपूर जाणवते. अशात या दिवसात त्वचा रखरखीत, कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेवरील चमक दूर होते. जर या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवर ड्रायनेस, खाज, डार्कनेस आणि डाग पडतात. मात्र, त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा इतर उत्पादनांचा वापर करण्याऐवजी एक नॅचरल उपाय करू शकता. तो म्हणजे खोबऱ्याचं तेल. या दिवसात चेहरा, हात-पायांवर खोबऱ्याचं तेल लावाल तर अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

चेहऱ्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. यात असे सगळे गुण असतात जे त्वचेसाठी गरजेचे असतात. या तेलाने त्वचेचा बाहेरील इन्फेक्शनपासून बचाव होतो. खोबऱ्याचं तेल नॅचरल मॉइश्चरायजरसारखं काम करतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे याने त्वचेला आतपर्यंत पोषण मिळतं आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत.

१) त्वचा हायड्रेट राहते

खोबऱ्याच्या तेलातील फॅटी अ‍ॅसिड त्वचेला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं आणि चमकदार बनवतं. याने चेहऱ्या कोणत्याही समस्या होत नाहीत. त्वचा आतून हेल्दी बनते. हिवाळ्यात या तेलाने त्वचेला अधिक फायदे मिळतात.

२) पिंपल्स होतील दूर

खोबऱ्याच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. याने चेहऱ्यावरील मळ, धूळ पूर्णपणे साफ होते आणि चेहरा सुंदर दिसतो. या तेलाने चेहऱ्यावरील वेगवेगळे डागही दूर होतात.

३) सुरकुत्या होतील दूर

खोबऱ्याचं तेल चेहऱ्यासाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही. यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. तसेच यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे चेहऱ्यावरील डागही दूर होतात. 

खोबऱ्याच्या तेलाचा कसा कराल वापर?

1) रोज रात्री झोपण्याआधी आपल्या चेहऱ्यावर खोबऱ्याचं तेल लावा.

२) आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा, त्यानंतर चेहऱ्यावर तेल लावा.

३) खोबऱ्याचं तेल तुम्ही चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवरही लावू शकता. याने त्वचा मुलायम होईल.

४) खोबऱ्याचं तेल रात्री झोपताना केसांना सुद्धा लावा. याने केसांमध्ये कोंडा होणार नाही. सोबतच केस मुलायम आणि चमकदार होतील.
 

Web Title: Coconut Oil In Winter : Use coconut oil on face daily for instant glow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.