ब्लीच वापरुनही मान काळीच दिसते का? वापरा या खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 11:33 AM2018-11-09T11:33:47+5:302018-11-09T11:33:54+5:30
अनेकजण शरीरात सर्वातआधी आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेची काळजी घेतात. त्यानंतर हात आणि पायांचा विचार केला जातो. पण मानेकडे फार लोक लक्षच देत नाहीत.
अनेकजण शरीरात सर्वातआधी आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेची काळजी घेतात. त्यानंतर हात आणि पायांचा विचार केला जातो. पण मानेकडे फार लोक लक्षच देत नाहीत. मानेची सुंदरताही तितकीच महत्त्वाची आहे, जितकी चेहऱ्याची. मानेचा रंग जेव्हा चेहऱ्याच्या रंगापेक्षा वेगळा असतो तेव्हा ते वेगळंच दिसतं. मानेची योग्य ती काळजी न घेतल्याने मान काळी किंवा सावळी होते आणि हे असंच राहिलं तर यावर रेषाही दिसायला लागतात. हा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ब्लीच वापरलं असेल आणि त्यानंतरही काळेपणा दूर झाला नसेल तर काही घरगुती उपाय तुम्ही वापरु शकता.
बेसन - बेसन जितकं खाण्यासाठी फायदेशीर असतं तितकचं ते आपल्या त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असतं. बेसनामुळे सहजपणे चेहऱ्यावरील मृत पेशी दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी बेसनामध्ये थोडी हळद आणि गुलाबजल मिश्रित करा. हे चांगल्याप्रकारे एकत्र करुन मानेवर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.
टोमॅटो - टोमॅटोता रस आणि मध एकत्र करुन मानेवर लावा. हे लावल्यावर काही वेळ तसंच राहू द्या आणि नंतर मान पाण्याने धुवा. याने फायदा होईल.
लिंबू - लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे तत्व असल्याने ते एका नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतं. आंघोळ करण्याआधी लिंबू मानेवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन-तिनदा लिंबाचा असा वापर केल्यास फायदा होईल.
दूध - दुधही आरोग्यासोबतच आपलं सौंदर्य वाढवण्यास मदत करतं. मान फारच काळी दिसत असेल तर कच्च्या दुधाने मानेची स्वच्छता करा. एका कपात कच्च दूध घ्या आणि रुईच्या मदतीने मानेवर लावा. जोपर्यंत दूध सुकून काळं पडत नाही तोपर्यत काढू नका. त्यानंतर मान पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवस हा उपाय केल्यास फायदा दिसेल.