सुंदर व स्वस्थ त्वचेसाठी करा फेशियल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 04:27 PM2016-11-26T16:27:58+5:302016-11-26T16:27:58+5:30
आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ असावी असे वाटण स्वाभाविक आहे. परंतु, बदलती जीवनशैली व त्यातील वाईट सवयी, प्रदूषण तसेच असंतुलित आहार यामुळे आपली त्वचा थकलेली, सुकलेली आणि पिंपलने भरलेली दिसते आणि आपले सौंदर्य खालावते.
Next
आ प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ असावी असे वाटण स्वाभाविक आहे. परंतु, बदलती जीवनशैली व त्यातील वाईट सवयी, प्रदूषण तसेच असंतुलित आहार यामुळे आपली त्वचा थकलेली, सुकलेली आणि पिंपलने भरलेली दिसते आणि आपले सौंदर्य खालावते. मात्र, नियमित फेशियल केल्यास आपली त्वचा स्वस्थ आणि सुंदर राहण्यासाठी मदत होते. त्यात एव्रीडे रेडीएंस फेशियल थकलेल्या त्वचेला प्रभावी उपचार देतात. इंस्टा ग्लोमध्ये समुद्री तत्वांचा वापर करून त्वचेतील कोरडेपण दूर केले जाते आणि त्वचा चमकायला लागते. तर टीट्री आॅईल जे त्वचेसाठी मिरॅकल हिलरचे काम करते. यातील प्राकृतिक गुण त्वचेला पोषण प्रदान करतात. हे कोको व्हिटामिन ए आणि अँटीआॅक्सिडंटने परिपूर्ण असतात जे त्वचेला नरम होण्यास मदत करतात. पिंपलची समस्या असलेल्यांसाठी विशेषज्ञ बँक्टेरियाविरोधी गुणांनी भरपूर असलेले फेशियल करावा. पण हे सर्व करताना योग्य आणि प्रशिक्षित ब्युटी थेरपिस्टकडूनच करून घ्यावा.