वजन वाढणं ही एक गंभीर समस्या असून त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण तुम्हालाही वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जिममध्ये जाण्यासाठी किंवा आणखीही काही उपाय करण्यासाठी वेळ नसेल तर घाबरू नका.
फिटनेस एक्सपर्ट इमरान खान याच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला केवळ जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनात काही छोटया छोट्या गोष्टींमुळेही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. ही कामं करून तुम्ही दिवसाला कमीत कमी १०० कॅलरी बर्न करू शकता.
१) उभे पाहून कपडे प्रेस केल्यास तुम्ही एका तासात १२२ ते १८३ कॅलरी बर्न करू शकता.
२) भांडी घासने हे तसं तुम्हाला बोरिंग आणि त्रासदायक काम वाटत असलं तरी हे फायद्याचं आहे. भांडी घासून तुम्ही एका तासात १२२ ते १८३ कॅलरीज बर्न करू शकता.
३) अनेकांना आपापली कामे करणे पसंत असते. काहींना स्वत:चे कपडे धुने पसंत असेत. कपडे धुवून हे लोक १२५ ते १७३ कॅलरी बर्न करु शकतात.
४) लहान मुलांसोबत खेळणे काहींना आवडतं तर काहींना आवडत नाही. पण याचा वजन कमी करण्यास फायदा होतो. लहान मुलांसोबत एक तासभर खेळल्यास किंवा त्यांना कडेवर घेतल्यास तुम्ही २०२ ते ३०२ कॅलरी बर्न करू शकता.
५) घराची लादी स्वच्छ करणे हाही एक उत्तम व्यायाम आहे. तुम्हीही लादी स्वच्छ केल्यास तुम्ही २४५ ते ३७० कॅलरी बर्न करू शकता.
६) जेवण तयार करण्यासाठी तुम्हाला किचनमध्ये काही तास उभं रहावं लागतं. याचा वैताग येत असला तरी हे फायद्याचं आहे. किचनमध्ये एक तास काम करुन तुम्ही १४४ ते २१५ कॅलजी बर्न करू शकता.
७) त्यासोबतच तुमच्या बागेची स्वच्छता केल्यासही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. बागेत एक तास काम केल्यास तुम्ही २८२ ते ४४२ कॅलरी बर्न करू शकता.