हाईक मेसेंजर’ बॉसचे फिटनेस फंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2016 9:03 AM
केविन भारती मित्तलने ‘फिट राहण्याचे’ त्याचे पर्सनल फंडे शेअर केले आहेत.
‘स्टार्ट-अप कल्चरमध्ये यशस्वी कंपनी चालविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. रोज 14-15 तास काम करणे ओघाने आलेच.आता स्वत:चा व्यावसाय वाढवायचा म्हटल्यावर तरुण उद्योजकांना शंभर टक्क्यांपेक्षा अधिक द्यावेच लागते. पण याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो.प्रसिद्ध मेसेंजिंग अॅप ‘हाईक मेसेंजर’चा संस्थापक 28 वर्षीय केविन भारती मित्तलने ‘फिट राहण्याचे’ त्याचे पर्सनल फंडे शेअर केले आहेत.तो म्हणतो, बारा तासांपेक्षा जास्त काम करायचे म्हटल्यावर शारीरिक क्षमता व उत्साह टिकवणे आवश्यक असते. म्हणून मी दररोज सकाळी व सायंकाळी अर्धा तास ध्यान लावतो (मेडिटेशन). आठवड्यातून किमान चार-पाच वेळा तरी व्यायाम करतो. कार्डिओ आणि वजन उचलण्याच्या व्यायामाला प्राधान्य देतो.फिट राहण्यासाठी तंत्रज्ञानाचीही तो मदत घेतो. विविध टेक्नो गॅजेटस् व अॅप्सचा तो वापर करतो.1. अॅपल वॉच : त्याने नुकतेच अॅपलची ‘आयवॉच’ खरेदी केली आहे. रोजची हालचाल, किती अंतर चालले, कॅलरी सेवनाचे प्रमाण अशी आरोग्यविषयक माहितीव या स्मार्टघडीच्या माध्यमातून तो नजर ठेवतो.2. एक्झिस्ट डॉट आयओ : तुम्ही रोज काय काय करता याची इत्थंभूत माहिती हे अॅप ठेवते. एका आॅस्ट्रेलियन डेव्हलोपरने बनवलेले हे अॅप पुढील सहा महिने नियमित वापरण्याचे त्याने ठरवले आहे.3. विथिंग्स : ही एक स्मार्ट स्केल असून त्याद्वारे बॉडी फॅट, वजन, बॉडी मास इंडेक्स इ. मोजेल जाते. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये दर आडवड्याला मोजलेल्या वजनाची माहिती त्यांच्याकडे आहे.