सध्या पार्लरच्या इतर ट्रिटमेंटपेक्षा स्पा ही कॉन्सेप्ट फार पॉप्युलर होत आहे. लोकांना आधी वाटायचं की, स्पा ही एक महागडी थेरपी आहे. पण असं नसून स्पा ही एक फार कमी किंमतीमध्ये होणारी थेरपी आहे. गेल्या काही दिवसांपासून फेशिअल, मेनिक्योर, पेडिक्योर, फुट मसाज, क्रीम बाथ आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्पा थेरपीचा वापर लोकं करू लागली आहेत. यामध्ये शरीराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या स्पा थेरपी सुचवण्यात येतात.
चॉकलेट स्पा
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी चॉकलेट स्पाचा उपयोग करण्यात येतो. ज्यामध्ये मसाज क्रिम आणि मास्कसाठी एका खास प्रकारच्या चॉकलेटचा वापर केला जातो. जे त्वचेच्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी उपयोगी ठरतं.
वाइन स्पा
वाइन स्पा त्वचेचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये करण्यात येणारी स्कीन ट्रिटमेंट वाइन बेस्ड असते. वाइन स्पा करण्याचा सल्ला साधारणतः 30 वर्षावरील महिलांना देण्यात येतो.
हेअर स्पा
प्रदूषण, हेअर ड्रायर आणि केमिकल प्रोडक्ट्सचा दररोज वापर केल्याने केसांचं ओरोग्य बिघडतं. ज्यामुळे केस पातळ होणं, केस दुभंगण आणि निर्जीव होण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी हेअर स्पा करणं फायदेशीर ठरतं.
या गोष्टी ठेवा लक्षात
आराम मिळवण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी स्पा फार फायदेशीर ठरतो. यादरम्यान आपला मोबाईल बंद ठेवा. स्पा करत असलेल्या खोलीमध्ये थोडाच उजेड ठेवा आणि सायलेंट म्युझिक लावा.
स्पाचे फायदे
आरोग्य आणि सौंदर्य राखण्यासाठी स्पा थेरपी फार फायदेशीर ठरते. लोकांमध्येही याची क्रेझ वाढत आहे. यामध्ये मसाज, बाथ, योग, मेडिटेशन आणि नैसर्गिक पदार्थांमार्फत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात येतात. यामुळे शरीर आणि त्वचा दोन्हींचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.