चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात? 'हा' उपाय ठरेल फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 04:04 PM2018-11-11T16:04:31+5:302018-11-11T16:07:13+5:30

सध्या अनेकांना चेहऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या उद्भवते. ज्यावेळी चेहऱ्यावरील स्किन पोर्स मोठे होतात त्यावेळा त्यामध्ये घाण साचते आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरमं येतात.

how to cure open facial pores lemon and coconut oil | चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात? 'हा' उपाय ठरेल फायदेशीर!

चेहऱ्यावरील ओपन पोर्सने त्रस्त आहात? 'हा' उपाय ठरेल फायदेशीर!

Next

सध्या अनेकांना चेहऱ्यावरील ओपन पोर्सची समस्या उद्भवते. ज्यावेळी चेहऱ्यावरील स्किन पोर्स मोठे होतात त्यावेळा त्यामध्ये घाण साचते आणि परिणामी चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरमं येतात. त्याचप्रमाणे ब्लॅक हेड्सची समस्याही होते. ओपन पोर्समुळे वातावरणातील अनेक बॅक्टेरियादेखील स्किनमध्ये प्रवेश करतात. असे झाल्याने अनेक गंभीर त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हीही ओपन पोर्सच्या समस्येचा सामना करत असाल तर वेळीच त्यावर उपचार करा. 

अनेकदा ओपन पोर्सवर काय उपचार करावे याबाबत गोंधळ उडतो. अजिबात गोंधळू नका ओपन पोर्सची समस्या होत असेल तर आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता. 

आवश्यक साहित्य :

चेहऱ्यावरील ओपन पोर्स दूर करण्यासाठी फार गोष्टींची गरज लागत नाही. यासाठी तुम्हाला घरी सहज उपलब्ध होणाऱ्या फक्त दोन पदार्थांची आवश्यकता असते. एक म्हणजे खोबऱ्याचे तेल आणि दुसरे म्हणजे लिंबू. यामुळे तुम्ही अगदी सहज ओपन पोर्सपासून सुटका करून घेऊ शकता. या दोन पदार्थांच्या वापरामुळे स्किन टाइट होण्यासोबतच तजेलदार होण्यासह मदत होते. 

असा करा वापर :

खोबऱ्याचे तेल आणि लिंबाचा वापर व्यवस्थित करणं गरजेचं असतं. याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत. 

एक मोठा चमचा खोबऱ्याचं तेल आणि एक चमचा लिंबाचा रस एका भांड्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

चेहरा कोमट पाण्याने नीट स्वच्छ करून घ्या. चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर केला तरी चालेल.

चेहरा स्वच्छ केल्यानंतर नारळ आणि लिंबू एकत्र केलेली पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर मसाज करा. 

मसाज केल्यानंतर कोमट पाण्यात स्वच्छ टॉवेल किंवा रूमाल भिजवा आणि त्याच टॉवेलने चेहरा हलक्या हाताने स्वच्छ करा. 

हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन दिवस तरी करा. दोन ते तीन आठवड्यांनी तुम्हाला जाणवेल की, चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होत असून स्किनवर उजाळादेखील येत आहे. 

Web Title: how to cure open facial pores lemon and coconut oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.