डोळ्यांखालचे काळे डाग तुमची सुंदरता कमी करतात. हे काळे डाग दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. पण असेही काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने हे काळे डाग दूर करता येतात. पण त्याआधी हे काळे डाग कशामुळे होतात हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
डोळ्यांखाली काळे डाग येण्याची अनेक कारणे आहेत. पोटाच्या समस्यांमुळेही हे काळे डाग येतात. त्यासोबतच जास्त ताण आणि कमी झोपेमुळेही हे काळे डाग येतात.
डोळ्यांखालचे हे काळे डाग दूर करण्याचे अनेक उपाय आहेत. पण मुलतानी मातीने ही समस्या लवकर दूर होऊ शकते. काळे डाग दूर करण्यासोबतच डोळ्यांना थंडावा देण्याचही काम मुलतानी माती करते. मुलतानी मातीसोबतच खालील गोष्टींनीही हे काळे डाग दूर केले जाऊ शकतात.
1) काकडीच्या रसासोबत मुलतानी माती - काकडीचा रस मुलतानी मातीत टाकून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. जेव्हा ही पेस्ट कोरडी होणार, तेव्हा धुवून टाका. काळे डाग कमी झालेले दिसतील.
2) मुलतानी माती, ग्लिसरीन आणि बदामची पेस्ट - मुलतानी माती, बदाम आणि ग्लिसरीनची पेस्ट करा. ती डोळ्यांखाली लावा आणि थोडा वेळ ठेवा. तुम्हाला हवं असेल तर ही पेस्ट तुम्ही चेह-यावरही लावू शकता. ही पेस्ट कोरडी झाल्यानंतर धुवून टाका.
3) मुलतानी माती आणि दूध - मुलतानी माती दूधासोबत एकत्र करुन लावल्यास काळे डाग दूर केले जाऊ शकतात. दूधातील काही गुणधर्मांमुळे डोळ्यांना आराम मिळेल.
4) दही आणि मुलतानी माती - दह्याने काळे डाग दूर केले जाऊ शकतात. अशात मुलतानी माती आणि दह्याची पेस्ट काळे डाग दूर करण्यासाठी चांगला पर्याय आहे. ही पेस्ट तुम्ही चेह-यावरही लावू शकता.
5) लिंबूचा रस आणि मुलतानी माती - डोळ्यांखालचे काळे डाग दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि लिंबूचा रस अधिक फायदेशीर ठरु शकतो. लिंबूमधील व्हिटामिन सी हे काळे डाग दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात.