डोळ्यांच्या पापण्या दाट करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:19 AM2018-09-10T11:19:43+5:302018-09-10T11:25:36+5:30
आपला चेहरा हिच आपली खरी ओळख असते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये भर पडते.
आपला चेहरा हिच आपली खरी ओळख असते असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. चेहऱ्याच्या सौंदर्यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वामध्ये भर पडते. त्यातल्या त्यात चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यामध्ये डोळ्यांची फार मोठी भूमिका असते. आपलं सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच महिलांचे निरनिराळे प्रयत्न सुरू असतात. त्यातल्या त्यात डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यात डोळ्यांच्या पापण्यांचं मोठे योगदान असते. परंतु जर तुमच्या पापण्या दाट नसतील तर, त्यासाठी महागड्या ट्रिटमेंट घेण्याऐवजी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या पापण्या दाट बनवू शकता...
1. एरंडेल तेल
थोडंसं एरडेल तेल हातावर घेऊन बोटाच्या मदतीने किंवा आय लॅशेज ब्रशच्या मदतीने पापण्यांवर लावा आणि रात्रभर तसचं ठेवा. साधारणतः एक आठवडा असं केल्याने पापण्या दाट आणि लांब होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त एरंडेल तेलाचा वापर पापण्यांऐवजी आयब्रोवर केल्यानेही आयब्रो दाट आणि सुंदर होण्यास मदत होईल.
2. व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
बाजारात सहज आणि अगदी कमी दरामध्ये या कॅप्सूल उपलब्ध होतात. या कॅप्सूल थोड्या फोडून त्यामधील औषध पापण्यांवर लावल्याने पापण्या दाट होण्यास मदत होते. केसांची वाढ होण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर असते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन ईचा वापर आयब्रो आणि केसांवर करणंही फायदेशीर ठरतं.
3. मसाज करणंही फायदेशीर
डोळ्यांच्या आयलिड्समुळेच पापण्यांच्या केसांची वाढ होते. येथील ब्लड फ्लो जर सुरळीत असेल तर पापण्यांची वाढ होण्यास मदत होईल. दोन्ही डोळ्यांना आय लिडवर मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढविण्यास मदत होईल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं केल्यानं फायदा होईल.
टिप : वरील उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.