दोन आठवड्यात ५ किलो वजन करा कमी, हा डाएट प्लॅन करा फॉलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 11:11 AM2018-11-09T11:11:24+5:302018-11-09T11:11:58+5:30
वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण असलेले लोक सतत काहीना काही प्रयत्न करत असतात. पण प्रत्येकालाच यश येतं असं अजिबात नाहीये.
(Image Credit : Body Sculptor)
वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण असलेले लोक सतत काहीना काही प्रयत्न करत असतात. पण प्रत्येकालाच यश येतं असं अजिबात नाहीये. वजन कमी करणं हे काही खाण्याचं काम नाही असंही तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण त्यासाठी वापरली जाणारी पद्धत जर योग्य असेल तर १०० तर नाही पण काहीना काही वजन नक्कीच कमी होऊ शकतं. आणि असं हळूहळू करुन तुम्ही तुम्हाला हवं तितकं वजन कमी करु शकता.
असाच कमी करण्याचा दोन आठवड्यांचा डाएट फ्लॅन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही थोडं तरी वजन कमी करु शकाल. पण त्यासाठी हा डाएट प्लॅन तंतोतंत फॉलो करणं गरजेचं आहे. तसेच या डाएटमुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदेही होतील.
पहिला दिवस
पहिल्या दिवाशी तुम्हाला केवळ फळं खायची आहेत. आंबा, द्राक्ष, पेरु, सफरचंग, स्ट्रॉबेरी, कलिंगड, खरबूज किंवा लिची ही फळे खावीत. पण यात केळ्याचा समावेश करु नका.
दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी तुम्हाला केवळ भाज्या खायच्या आहेत. कच्च्या किंवा उखडलेल्या स्वरुपात तुम्ही या भाज्यांचं सेवन करु शकता. बटाटे, हिरव्या भाज्या किंवा सलाद म्हणून काकडी, फ्लॉवर, गाजर, मूळा, बीट किंवा कोणतीही भाजी खाऊ शकता. रंगीबेरंगी भाज्यांचं अधिक सेवन करा.
तिसरा दिवस
तिसऱ्या दिवशी तुम्हाला भाज्या आणि फळे दोन्ही खायची आहेत. हवं असेल कर ज्यूसही घेऊ शकता. पण तिसऱ्या दिवशी बटाटे आणि रताळे खाऊ नका. हे खाण्याआधी एक ग्लास थंड पाणी प्या नंतर खायला बसा. प्रत्येकवेळी खाण्याआधी थंड पाणी प्यावे. कारण याने मेटाबॉलिज्म स्तर वाढतो आणि तुम्ही कमी खाता.
चौथा दिवस
चौथ्या दिवशी तुम्ही सहा केळी आणि चार ग्लास दूध घेऊ शकता. या दिवशी तुम्ही भाज्यांचा सूपही घेऊ शकता. लसूण, शिमला मिरची, कांद्यांची पाल आणि टोमॅटो सूप तयार करा. कारण यातून तुम्हाला अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात.
पाचवा दिवस
आज टोमॅटो, पनीर, मोड आलेले चणे, सोयाबीन खावे. तुम्ही टोमॅटोचा सूपही सेवन करु शकता. टोमॅटोमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते. सोबतच शरीर डीटॉक्स होतं. तसेच शरीरात यूरिक अॅसिडही बाहेर येतं.
सहावा दिवस
सहाव्या दिवशी टोमॅटो चुकूनही खाऊ नये. या दिवशी मोड आलेल्या डाळी आणि पनीर खावे. पनीरमध्ये प्रोटीन भरपूर असतं. सूपसोबतच भरपूर पाणी प्यावे.
सातवा दिवस
आठवड्यातील शेवटच्या दिवशी केवळ ताज्या फळांचा ज्यूस प्यावा. सोबतच एक कप ब्राऊन राइस, एक चपाती आणि हिरव्या भाज्या खाऊ शकता.
(टिप : हा डाएट प्लॅन फॉलो करुन केवळ आठवड्यात वजन कमी होणार नाही. आम्ही तसा दावाही करत नाही. पण नियमीत हा डाएट प्लॅन फॉलो केल्यास तुमचं वजन कमी होण्यास नक्की मदत होईल)