दाट दाढी येत नाही ? हे उपाय करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 02:05 PM2018-04-09T14:05:19+5:302018-04-09T14:05:19+5:30

पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. दाट दाढी न वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत.

How to make your beard grow faster | दाट दाढी येत नाही ? हे उपाय करून बघा!

दाट दाढी येत नाही ? हे उपाय करून बघा!

googlenewsNext

रणवीर सिंह, रणबीर कपूर आणि विराट कोहली यांच्या दाढी ठेवण्याच्या स्टाईलने देशातील तरुणाई चांगलीच प्रभावीत झाली आहे. सगळेजण त्यांचीच स्टाईल फॉलो करायला बघतात. पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. दाट दाढी न वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील महत्वाची कारणे म्हणजे हार्मोनचा बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र, आयुर्वेदात असे काही उपचार सांगण्यात आले आहेत, जे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.

सध्या दाढी ट्रेंड पाहता. यावर काही संशोधनही करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॅरेंबी डिक्सन युनिव्हर्सिटीत नुकतंच मुलांच्या दाढीवर एक अध्ययन करण्यात आलं. ज्यात समोर आलं की, ज्या मुलांची लांब दाढी असते, त्या मुलांकडे गर्लफ्रेन्ड किंवा त्याची पत्नी जास्त आकर्षित होते. त्यामुळे तुम्हाला जर मुलींना खूश करायचं असेल तर चुकूनही शेव्ह करू नका.

काय करावे उपाय?

रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.

नारळाच्या तेलात ५-६ कढीपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

नियमितपणे गाजराचा ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.

थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम होईलच तसेच दाढी वाढेल.
 

Web Title: How to make your beard grow faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.