फेस मास्क पार्लरमध्ये जाऊन लावा किंवा घरी लावा दोन्हींमध्ये फार फरक नाही. पण जाणून घेण्यासारखी बाब ही आहे की, आठवड्यातून किती वेळा किंवा महिन्यातून कितीवेळा फेस मास्कचा वापर करावा. कितीवेळा वापर केल्याने किती फायदा होतो किंवा नुकसान होतं हेही माहीत असणं गरजेचं आहे. फेस मास्कमुळे आपल्या त्वचेवर चमकदारपणा येतो आणि चेहरा स्वच्छ होतो.
वेगवेगळ्या स्कीन एक्सपर्टनुसार, तुम्ही कोणत्या प्रकारचा फेस मास्क वापरत आहात यावर त्याचा कितीदा वापर करावा हे निर्भर आहे. उदाहरण द्यायचंच तर ती खासप्रकारचे फेस मास्क असतात.
१) अॅटी-एजिंग
२) एक्स्फोलिएटिंग
३) अॅटी-एक्ने
याप्रकारचे फेस मास्क जास्तकरुन केमिकल असलेले असतात. त्यामुळे यांचा वापर निर्देशांनुसार केला जावा. सामान्यत: फेस मास्क महिन्यातून केवळ एक किंवा दोनदा वापरावे.
रोज जे फेस मास्क वापरले जातात त्यांच्यात खालील क्वॉलिटी असतात.
- एलोवेरा
- अॅटी-ऑक्सिडेंट
- नियासिन व्हिटॅमिन
- व्हिटॅमिन्स
चला जाणून घेऊ कोणत्या प्रकारचं फेस पॅक किती अंतराने वापरावं.
१) चारकोल फेस मास्क
चारकोल फेस मास्क फार हार्श असतो आणि यात केमिकलचं प्रमाणही अधिक असतं. हे स्कीनमधून बॅक्टेरिया, टॉक्सिन, घाण, तेल, दुषित कण बाहेर काढतात. हा मास्क एकदाच फार खोलवर प्रभाव करतो त्यामुळे याचा वापर महिन्यातून केवळ एकदाच व्हायला हवा.
२) जेलाटीन फेस मास्क
त्वचेमध्ये पोषक तत्व कमी असल्याने त्वचा कोमजल्यावर, डेड स्कीन सेल्स वाढल्यावर जेलाटीन फेस मास्कचा वापर केला जातो. पण हा मास्क स्कीनला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे याचा वापर जास्त किंवा लवकर करु नये. स्कीन एक्सपर्ट महिन्यातून दोनदा जेलाटीन फेस मास्क वापरण्याचा सल्ला देतात.
३) कोरियन शीट फेस मास्क
अलिकडे मार्केटमध्ये शीट रुपातील फेस मास्क भरपूर आले आहेत. यांचा वापर करण्याचा फॅशन ट्रेन्ड होत आहे. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यावर २० मिनिटांनी हा मास्क आपोआप भिजून निघू लागतो. या २० मिनिटांमध्येच हा मास्क आपलं काम करुन जातो. हा मास्क आठवड्यातून एकदा लावण्याचा सल्ला किंवा महिन्यातून तीनदा लावण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात.
४) क्ले फेस मास्क
क्ले फेस मास्कला लोक नैसर्गिक मानतात आणि याचा वापर अधिक करतात. पण या फेस मास्कमध्येही केमिकलचं प्रमाण असतं. क्ले मास्क स्कीनवर आतपर्यंत प्रभाव करतो आणि त्वचेला पोषक तत्व देतो. क्ले फेस मास्क आठवड्यातून दोनदा वापरला जाऊ शकतो.
५) घरी तयार केलेले फेस मास्क
नैसर्गिक वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फेस मास्क त्वचेसाठी वापरल्यास नेहमी पॉझिटीव्ह रिझल्ट मिळतो. या केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं. जर त्यात तुम्ही काही मिश्रित केलं तरच त्यात केमिकल येतं. नैसर्गिक असल्याने याचा वापर नुकसानकारक नाहीये. तरीही याचा आठवड्यातून तीनदा वापर केला जाऊ शकतो.