केसांवर अशा पद्धतीने लावा तूप, काही दिवसात होतील मजबूत आणि चमकदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 02:48 PM2024-11-29T14:48:40+5:302024-11-29T14:53:08+5:30

केस मजबूत करण्यासाठी तूप केसांवरही लावलं जाऊ शकतं. बरेच लोक फार पूर्वीपासून हा उपाय करतात.

How to apply ghee for long and strong | केसांवर अशा पद्धतीने लावा तूप, काही दिवसात होतील मजबूत आणि चमकदार!

केसांवर अशा पद्धतीने लावा तूप, काही दिवसात होतील मजबूत आणि चमकदार!

Hair Care: भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबतच तूप सुद्धा आवर्जून असतं तुपाने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुपाचे त्वचा आणि केसांनाही फायदे मिळतात. तुपातील फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन्स आणि गुड फॅट्स केसांना मजबूत करतात. केस मजबूत करण्यासाठी तूप केसांवरही लावलं जाऊ शकतं. बरेच लोक फार पूर्वीपासून हा उपाय करतात. चला जाणून घेऊ तूप केसांना लावण्याचे फायदे आणि योग्य पद्धत...

केसांसाठी तूप

- केसांना तूप लावल्याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. इतकंच नाही तर तुपामुळे केसांमधील कोंडाही कमी होतो. तेच कोंड्यामुळे होणारी खाजेची समस्याही दूर होते.

- व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यात भरपूर असल्याने आणि फॅटी अॅसिड असल्याने तूप केसांना लावलं तर केसांची वाढ वेगाने होते. तसेच केसगळतीची समस्याही कमी होते.

- केसांवर तूप लावल्याने डोक्याची त्वचा हायड्रेटेड राहते. याने केस चमकदार होतात आणि मुलायमही होतात. केसांचं टेक्सचरही चांगलं होतं.

- तूप एका नॅचरल हेअर कंडिशनरसारखं काम करतं. हे केसांवर लावल्याने केसांचा रखरखीतपणा दूर होतो. केस मुलायम होतात.

केसांवर कसं लावाल तूप?

तूप केसांवर लावण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार, तूप आधी थोडं हलकं गरम करा. हलकं कोमट तूप केसांच्या मुळात लावा. त्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. 
तूप केसांवर हेअर मास्कच्या रूपातही लावू शकता. तूप केसांवर लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. 

केस धुतल्यानंतर थोडं तूप केसांवर सीरम किंवा लीन इन कंडीशनरसारखं लावलं जाऊ शकतं. याने केसांचा प्रदूषण आणि उन्हापासून बचाव होतो.
 

Web Title: How to apply ghee for long and strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.