केसगळती रोखण्यासाठी हिवाळ्यात आवळ्याचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:29 PM2024-11-28T12:29:47+5:302024-11-28T12:44:34+5:30
Hair Fall : केसगळती थांबवण्यासाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. याने नॅचरल पद्धतीने केसगळती थांबते आणि केस काळेही होतात.
Hair Fall In Winters : केसगळतीची समस्या वेगवेगळ्या कारणांनी होत असते. खासकरून हिवाळ्यात जास्तीत जास्त लोकांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशात केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचाही वापर केला जातो. मात्र, याने केसांचं आणखी जास्त नुकसान होतं.
केसगळती थांबवण्यासाठी आवळा एक रामबाण उपाय ठरू शकतो. याने नॅचरल पद्धतीने केसगळती थांबते आणि केस काळेही होतात. आयुर्वेदात आवळ्याला केसांसाठी टॉनिक मानलं जातं. आवळ्याचं सेवन केल्याने केसगळती तर थांबतेच सोबतच केस मुलायम, चमकदार होतात.
आवळ्याचा कसा कराल वापर?
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात वेगवेगळे अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्सही असतात. हे शरीरात गेल्यावर पोषण मिळतं आणि केसांनाही फायदे मिळतात. केसांना आवळा लावल्याने केस मजबूत होतात. तसेच केस काळेही होतात.
- आवळ्याचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून एकदा जेवणासोबत आवळ्याची चटणी खाऊ शकता.
- आवळ्याचा ज्यूस पिणंही केसांसाठी खूप फायदेशीर आहे. या ज्यूसने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि डायबिटीससारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
सकाळी आवळ्याचं पावडर किंवा त्रिफळा पावडर पाण्यात मिक्स करून पिऊ शकता.
केसांवर कसा लावाल आवळा?
आवळ्याच्या तेलाने मालिश
केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या तेलाने रोज डोक्याची मालिश करावी. या तेलाने केसांना मुळापासून पोषण मिळतं. याने केस पातळ होण्याची समस्याही कमी होते. केस मुळापासून मजबूत होतात. इतकंच नाही तर केस वाढतात आणि मुलायम होतात.
आवळ्याचा हेअर मास्क
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे आवळ्याचं पावडर टाका. यात तुम्ही शिकेकाईचं पावडरही १ ते २ चमचे टाकू शकता. या गोष्टी मिक्स करून हेअर मास्क बनवा आणि केसांवर लावा. हा हेअर मास्क केसांवर एक ते दीड तास राहू द्या. त्यानंतर पाण्याने केस धुवून घ्या.