प्रत्येकालाच या जगाच श्रीमंत व्हायचं असतं. पैसा मिळवण्यासाठी लोक आयुष्यभर मेहनत करतात. आणि त्यांना भरमसाठ पैसा मिळेपर्यंत त्यांचं वयही वाढलेलं असतं. पण केवळ 20 वर्षांच्या एका मुलीने जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
फोर्ब्स मॅगझिननुसार, अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल काइली जेनर ही 20व्या वर्षी 90 कोटी डॉलर म्हणजेच 6120 कोटी रूपयांची मालक झाली आहे. मॅगझिनने काइलीला सर्वात कमी वय असलेली 'सेल्फ मेड' अरबपती म्हणून घोषित केलं आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी काइलीने 'काइली कॉस्मेटिक' नावाने एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनी महिलांसाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट तयार करते. या कंपनीने दोन वर्षांतच इतकी कमाई केली की, काइली अबरपती झाली.
कॉस्मेटिक प्रॉडक्ट तयार करणे हीच काइलीची आवड नाहीये. ती एक प्रसिद्ध मॉडलही आहे. त्यामुळेच तिची कंपनी कमी काळातच इतकी लोकप्रिय झाली. काइली सोशल मीडियात चांगलीच अॅक्टीव्ह असते. तिचे फोटो सतत व्हायरल होत असतात. तिच्या परफेक्ट फिगरचे लाखों चाहेत आहे. काइलीच्या परफेक्ट फिगरचे अनेक सिक्रेट्स आहेत.
1) एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, काइलीने तिच्या ब्यूटी सिक्रेटबाबत माहिती दिली होती. बॉडी फिट ठेवण्यासाठी काइली जास्तीत जास्त पाणी पिते. त्यासोबतच लिक्विड पदार्थांचं सेवन करते. यामुळे तिची स्कीन चांगली राहते.
2) काइलीने सांगितले की, चेहऱ्यांची सुंदरता कायम ठेवण्यासाठी ती रोज तिचा चेहरा धुवून झोपते. त्यासंबंधी एकही अॅक्टीव्हीटी विसरत नाही. संपूर्ण शरीर मॉईश्चराईज राहिल याची ती सतत काळजी घेते.
3) स्वत:ला स्टायलिश आणि फॅशनेबल ठेवण्यासाठी काइली प्रत्येक प्रकारचे कपडे आणि रंग निवडते.
4) ओठांसाठीही काइली सर्वच रंगांची निवड करते. आपल्या लूकमध्ये एक्सपरिमेंट करत राहणं काइलीला पसंत आहे.