पुरुषांचे सौंदर्य खुलविताना...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2016 01:02 PM2016-12-03T13:02:41+5:302016-12-03T13:02:41+5:30
महिलांबरोबरच आता पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यायला लागले आहेत. आपला लूक इतरांपेक्षा चांगला दिसावा...
Next
म िलांबरोबरच आता पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यायला लागले आहेत. आपला लूक इतरांपेक्षा चांगला दिसावा, चेहऱ्याची त्वचा फ्रेश दिसावी यासाठी तेही बरेच प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. आज आपणास आपली त्वचा उजळ व चमकदार होण्यासाठी घरच्या घरी काय करू शकता याविषयी माहिती देत असून, या टिप्स फॉलो केल्यानंतर काही दिवसातच आपणास फ्रेश लूक मिळू शकेल.
लिंबाचा रस
चेहऱ्याची त्वचा उजळ व चमकदार होण्यासाठी त्वचेचे ब्लिच होणे गरजेचे असते. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असल्याने हा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होऊन ब्लिचींग होते. त्यामुळे त्वचा उजाळण्यास मदत होते.
कोरफड
आपल्या त्वचेचे मॉयश्चरायजर होणेही महत्त्वाचे असते. कोरपडमध्ये अॅँटीआॅक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असल्याने चेहºयावर लावू शकतात. यामुळे त्वचेचे चांगल्या प्रकारे मॉयश्चरायजर होऊन चेहºयाची चकाकी वाढते.
दही व वाटाण्याचे पीठ
दहीमध्ये वाटाण्याचे पीठ मिक्स करून चेहºयाला लावल्यास त्यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचा चमकदार होते.
मध व चुना
चेहऱ्याची त्वचा उजाळण्यासाठी मध व चुन्याचा योग्य वापर करु शकता. यासाठी मधामध्ये खूप कमी प्रमाणात चुना घेऊन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास काही आठवड्यातच तुमची त्वचा उजळेल.
चंदन, हळद, बदाम आणि कडुलिंबाची पाने
आपल्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज असेल तर चंदन, हळद, बदाम आणि कडुलिंबाची पाने यांचा वापर करु शकता. वरील घटकांचे एकत्रित मिश्रण तयार करुन दुधाबरोबर मिक्स करून लावल्यास चेहऱ्याला उजाळण्यास नक्कीच मदत होते. हे मिश्रण लावल्यानंतर १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास तुमची त्वचा चमकदार दिसते.
आॅलिव्ह तेल
चेहऱ्याची त्वचा निस्तेज होण्याचे मृत पेशी हे एक कारण आहे. यासाठी आॅलिव्ह तेलाने चेहºयाचा मसाज केल्यास पेशी अॅक्टिव्ह होऊन त्वचा सतेज होते.