आता घरीच करा ‘हेअर स्पा’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 5:37 PM
केसांना योग्य पोषण मिळून ते चमकदार होण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जातात.....
केसांना योग्य पोषण मिळून ते चमकदार होण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये हेअर स्पा करण्यासाठी जातात. मात्र पार्लरमध्ये रोजच हेअर स्पा करणे खर्चिक आहे. यामुळे घरच्या घरी हेअर स्पा कसा करावा याबाबत जाणून घेऊया...* केसांना नैसर्गिक चमक येण्यासाठी केसांचे आरोग्य उत्तम असावे. यासाठी डोक्याला आॅलिव्ह तेल लावून हलक्या हाताने १५ मिनिटे मालिश करा. यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवा आणि तो पुन्हा चांगला पिळून डोक्याला गुंडाळा. यामुळे डोक्याला वाफ मिळेल. यानंतर केस ओले करून सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास ते चमकदार होतील.* केसाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने उपलब्ध आहेत. त्यासाठी खोबरेल तेलामध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा आणि हे मिश्रण डोक्याला लावा. थोड्या वेळानंतर एक पिकलेले केळ कुस्करुन केसाच्या मुळांपासून-टोकांपर्यंत लावा. यावर गरम टॉवेलने पॅक करुन १५ मिनिटांनी थंड पाण्याने केस धुऊन नंतर हर्बल शॅम्पूने धुवा. केळामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम, नैसर्गिक तेल, जीवनसत्व यामुळे केस मुलायम होतात. * दुधातील पोषक घटक केसाचे योग्य प्रकारे पोषण करतात. कोमट दुधामध्ये थोडेसे आॅलिव्ह तेलाचे थेंब टाकून हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर थोडावेळ हळूवार केसाचे मालिश करा. मालिश केल्यानंतर वाफ द्या. असे पंधरा दिवसातून एकदा केल्यास तुम्हाला मुलायम आणि चमकदार केस मिळतील.