केसांची समस्या भेडसावतेय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 5:14 PM
महिलांचे सौंदर्य खुलविण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे सर्वच महिलांना आपले केस लांबसडक, काळे, घनदाट असावेत असे वाटते. विशेष म्हणजे असे केस स्त्रियांसोबत पुरुषांनादेखील आकर्षित करतात.
-Ravindra Moreमहिलांचे सौंदर्य खुलविण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे सर्वच महिलांना आपले केस लांबसडक, काळे, घनदाट असावेत असे वाटते. विशेष म्हणजे असे केस स्त्रियांसोबत पुरुषांनादेखील आकर्षित करतात. वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल यामुळे आजकाल केस गळणे, पिकणे, दुभंगणे, कोंडा होणे अशा अनेक समस्या महिलांना भेडसावतात. या समस्या सोडविण्यासाठी महिला अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करतात. मात्र अपेक्षित फायदा होत नसल्याने नाराजही होतात. आजच्या सदरात आम्ही तुम्हांला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे घरबसल्या तुम्ही केसांच्या समस्या सोडवू शकता.* आवळा-केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि आवळयांमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते. यासाठी आवळ्याचा उपयोग आपल्या आहारात करावा. आवळ्याचे लोणचे, रस किंवा आवळ्याचा मुखवास हे घरात असावेतच. आवळ्याचा विविध व्यंजनांचा समावेश आपल्या आहारात करावा. तसेच आवळा खोबरेल तेलामध्ये काही दिवस ठेऊन ते तेल लावणेही केसांना फायदेशीर ठरते. * कांदा-बºयाच जणांना केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्या असतात. त्यामुळे केसांचे आरोग्य ढासळते. यासाठी कांदा हा उपयुक्त असून, कांद्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये नेहमीच करावा. तसेच २ ते ३ कांद्यांचा रस काढून तो रस केसांच्या मुळाशी लावावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी सौम्य शांपूने केस धुवावेत. यामुळे केसातील कोंडा कमी होऊन केसांची वाढ योग्य प्रकारे होते. * तिळाचे तेल-केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने केस अकाली पांढरे होतात. त्यामुळे साहजिकच आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होतो. पांढºया केसांना तिळाचे तेल लावल्यास नक्कीच फायदा होतो. नारळाच्या तेलासारखेच तिळाचे तेलही केसांना गुणकारी आहे. * कडुलिंबाची पाने-केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे कडुलिंबाची पाने होय. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ती केसांच्या मुळांना लावावी. त्यानंतर सौम्य शांपूने केस धुऊन टाकावेत, कोंडा निघून जातो. शिवाय केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. * चहाची पाने-आपल्या रोजच्या वापरातील चहादेखील केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चहाच्या पानांचा पेस्ट करुन ती पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळवावीत आणि ते पाणी केसांना लावावे. यामुळे केस काळे राखण्यास मदत होते.* संत्री-केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी फारच उपयुक्त असल्याने संत्र्याचा रस केसांना लाऊन तो रस काही वेळ ठेवावा आणि केस धुवावेत यामुळे केस मुळापासून मजबूत आणि मऊ होतात. यापद्धतीने आपण आपल्या केसांची काळजी घरच्या घरी घेऊन केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकू .