...म्हणून टॅटू काढणे पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 01:39 PM2018-04-11T13:39:06+5:302018-04-11T13:39:06+5:30

टॅटू काढून अनेकजण आपल्या व्यक्तिमत्वाचीही ओळख करुन देत असतात. पण ही टॅटूची आवड कशी घातक ठरु शकते हे जाणून घेतल्यावर तुम्ही टॅटू काढण्याचा विचारही करणार नाही.  

Reasons why you should never have a tattoo | ...म्हणून टॅटू काढणे पडू शकते महागात

...म्हणून टॅटू काढणे पडू शकते महागात

googlenewsNext

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी  अनेकजण टॅटू काढतात. टॅटूची मोठी क्रेझ बघायला मिळते. टॅटू काढून अनेकजण आपल्या व्यक्तिमत्वाचीही ओळख करुन देत असतात. पण ही टॅटूची आवड कशी घातक ठरु शकते हे जाणून घेतल्यावर तुम्ही टॅटू काढण्याचा विचारही करणार नाही.    

का काढू नये टॅटू?

टॅटू काढण्याआधी आपल्या आर्टिस्टला जाणून घेणे गरजेचे आहे. पण कुणीही असं करत नाही. टॅटू काढण्याआधी त्या आर्टिस्टचा पोर्टपोलिओ जाणून घ्या. त्याचं काम जाणून घ्या. अनेक टॅटू आर्टिस्ट हे आरोग्य आणि सुरक्षेचे नियम पाळत नाहीत. टॅटू काढणा-याने हातात ग्लव्स घातले का? टॅटू काढण्यासाठी त्याने नवीन सुई घेतली का? टॅटू काढण्याचे साहित्य स्टॅरेलाईज केले का? या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. 

टॅटू आर्टिस्टला ओळखणे आवश्यक

एक चुकीचा टॅटू आर्टिस्ट तुम्हाला एका खराब टॅटू सोबतच अनेक प्रकारचे रोगही देऊ शकतो. जर या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही की, तर तुम्हाला स्कीन इन्फेक्शनसोबत HIV/AIDS आणि Hepatitis C सारख्या आजारांचे संक्रमन होऊ शकतं. 

नोकरी मिळण्यात समस्या होऊ शकते

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर व्यक्तीचा टॅटू व्हिजिबल आहे. म्हणजे बाहेरुन टॅटू दिसतोयय तर अशांना नोकरी मिळण्यास अडचणी येऊ शकतात. कारण टॅटूबाबत लोकांमध्ये एक नकारात्मक पूर्वाग्रह असतो.

टॅटूचा अतिउत्साह आणतो अडचणीत

दुसरे टॅटू काढलेले लोक पाहून तुम्हीही जोशमध्ये येता. आणि जास्त विचार न करता टॅटू काढता. त्यावेळी याचा तुम्ही जराही विचार करत नाही की, तुम्हाला या निर्णयासोबत आयुष्य काढायचं आहे. नंतर याता पश्चातापही होऊ शकतो. मग तो कसा काढावा याची अडचणही येते. 

जर तुम्ही आई होणार असाल

भलेही टॅटू काढला जाऊ शकतो. पण हा एक मोठा निर्णय असतो. याला सहज घेतलं जाऊ शकत नाही. याच्या परीणामांचाही विचार करणं गरजेचं असतं. जर भविष्यात तुम्ही आई होण्याचा विचार करत असाल. तर वजन वाढल्याने आणि शरीरावर स्ट्रेच मार्क आल्याने त्वचा सैल होऊ शकते. त्यामुळे आहे तसा दिसणार नाही. 

घामाला रोखतो टॅटू

शरीरातून घाम बाहेर येणं हे फार गरजेचं आहे. पण एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, टॅटू शरीरातील घाम येण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकतो. टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी शाई ही घामला रोखते. त्यामुळे टॅटू काढण्यासाठी योग्य जागेचा वापर करा.
 

Web Title: Reasons why you should never have a tattoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.