मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:22 AM2019-09-21T11:22:01+5:302019-09-21T11:22:11+5:30

सामान्यपणे मोहरीच्या बियांचा वापर पदार्थांना तडका देण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, मोहरीच्या बियांनी त्वचा ग्लोईंग करता येते.

Skin benefits of mustard seeds | मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का?

मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Next

मोहरीच्या तेलाचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच. पण मोहरीच्या बियांनी त्वचेसाठी होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? मोहरीच्या बियांचा बायबल आणि हिंदू पुराणांमध्ये संदर्भ आढळतात. त्यामुळे मोहरीच्या तेलाचा आणि बियांचा वापर पूर्वीपासून होतो हे दिसून येतं. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासोबतच मोहरीच्या बीया सुंदरता वाढवण्यातही फायदेशीर ठरतात.

सामान्यपणे मोहरीच्या बियांचा वापर पदार्थांना तडका देण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, मोहरीच्या बियांनी त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचं तेल त्वचा तरूण करण्यासोबतच ग्लोईंगही करते. ड्राय स्कीन असलेल्यांसाठी मोहरीच्या बीया रामबाण उपाय मानल्या जातात. चला जाणून घेऊ आणखी काही फायदे....

नॅच्युरल स्क्रब

(Image Credit : thebestfacescrub.com)

मोहरीच्या बीया एकप्रकारे नॅच्युरल स्क्रबप्रमाणे काम करतात. यात तुम्ही लॅवेंडर आणि गुलाब असेंशिअलचे काही थेंब टाकू शकता. आता यापासून एक स्क्रब तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करून तुम्ही त्वचेवरील डेड स्कीन दूर करू शकता.

डायड्रेट त्वचा

(Image Credit ; blog-well.ca)

मोहरीच्या बियांचं पावडर तयार करून त्यात अॅलोवेरा जेल मिश्रित करून चेहऱ्यावर लावता येतं. याने चेहरा हायड्रेट राहतो. याने चेहरा स्वच्छ होतो आणि चमकदार होतो.

अ‍ॅंटी-एजिंग

(Image Credit : marketwatch.com)

मोहरीच्या बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन आढळत. यात व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असतात. सर्वच पोषक तत्व एक चांगलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तयार करतात. त्यामुळे हे सर्वच तत्व एका अ‍ॅंटी-एजिंगप्रमाणे काम करतं. याने त्वचा तरूण दिसते. 

केसांची वाढ 

मोहरीच्या बियांपासून काढण्यात आलेल्या तेलात व्हिटॅमिन ए भरपूर असतात. व्हिटॅमिन ए केसांच्या विकासासाठी अधिक फायदेशीर असतं. यात केसांची वाढ वेगाने करण्याचे गुण असतात.

इन्फेक्शनपासून दूर

(Image Credit : bebeautiful.in)

मोहरीच्या बियांमध्ये सल्फर हे तत्व आढळतं. यात अ‍ॅंटी-फंगल गुण आढळतात, जे चेहऱ्यावर होणाऱ्या संक्रमणाला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.

Web Title: Skin benefits of mustard seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.