चेहऱ्यासह मान आणि छातीवर येणारे पिंपल्स नको वाटतात? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:12 PM2020-08-30T18:12:09+5:302020-08-30T18:18:58+5:30

त्वचेतून सीबमचं उत्पादन जास्त होते. त्वचेवरील तैलग्रंथीमुळे जास्त तेल जमा होतं परिणाम पुळ्या येतात.

Skin Care Tips Marathi : Home Remedies For remove pimples | चेहऱ्यासह मान आणि छातीवर येणारे पिंपल्स नको वाटतात? जाणून घ्या कारणं आणि उपाय

चेहऱ्यासह मान आणि छातीवर येणारे पिंपल्स नको वाटतात? जाणून घ्या कारणं आणि उपाय

Next

तुम्हाला वाटत असेल पिंपल्स फक्त चेहऱ्यावर येतात. तर असा विचार करणं चुकीचं आहे. कारण शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर पिंपल्स येऊ शकतात.  शरीराच्या विविध भागांवर वेगवेगळ्या कारणानं पिंपल्स येतात. आज आम्ही तुम्हाला छातीवर आणि मानेवर पिंपल्स येण्याची कारणं सांगणार आहोत. पिंपल्स, ब्लॅकहेड्स, आणि व्हाईटहेड्स, दाणे तयार होणं, पिंम्पल्समधून पस बाहेर येणं अशी लक्षणं मानेवर आणि छातीवर दिसू शकतात.

या भागातील त्वचेतून सीबमचं उत्पादन जास्त होते. त्वचेवरील तैलग्रंथीमुळे जास्त तेल जमा होतं परिणाम पुळ्या येतात. व्यायाम केल्यानंतर तुमच्या मानेवर किंवा छातीवर घाम आला असेल तर पुळ्या येऊ शकतात. त्यासाठी व्यायाम करून झाल्यानंतर साबणाने स्वच्छ अंघोळ करा. जेणेकरून मानेवर किंवा छातीवर बॅक्टेरिया आणि घामातील घातक घटक जमा राहणार नाहीत. शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळेही त्वचेवर पुळ्या येतात. कमी प्रमाणात  पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते परिणामी पुळ्या येतात. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते. 

उपाय

तुमचा चेहरा किंवा शरीराला वाफ दिल्यानं शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची छिद्र ओपन होत असतात. एका भांड्यात पाणी गरम करून टॉवेलने झाकून वाफ घ्या. त्यानंतर चेहरा आणि मानेला घाम आल्यानंतर स्वच्छ कापडाचा वापर करून चेहरा पुसून घ्या.

पाणी शरीरासाठी आणि त्वचेवरील समस्येसाठी उत्तम उपाय आहे. जे लोक खूप पाणी पितात  त्यांची स्किन हायड्रेट राहते.  मुत्राद्वारे शरीरातील नको असलेले आणि घातक पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. शरीराला फायबर्सची सुद्धा गरज असते. त्यासाठी ज्यूसचा आहारात समावेश करा. रोज असं केल्यास त्वचेला पोषण मिळत असतं. जेणेकरून शरीरातील विषारी घटक जास्त काळ राहणार नाही.

आपल्या शरीराला येणारा घाम संपूर्ण शरीराला डिटॉक्स करत असतो. त्यामुळे व्यायाम दररोज करा. जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि शरीरातील टॉक्सिन्स निघून जातील. त्यासाठी योगा किंवा कार्डीओ व्यायाम करा. त्यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल. 

आपण जे काही खात असतो. त्याचा  आपल्या त्वचेवर आणि शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे चॉकलेट, मिल्कशेक यांसारखे पदार्थ तुम्हाला खायला आवडत असतील तर त्यांचे सेवन शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यासाठी आहारात ताजी फळं, भाज्या यांचा समावेश करा. केमिकल्सयुक्त क्रिम्सचा वापर करण्याऐवजी घरुगुती सामानाचा वापर करून त्वचेर फेशियल किंवा मसाज करा. 

हे पण वाचा- 

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

Web Title: Skin Care Tips Marathi : Home Remedies For remove pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.