योग्य टुथब्रश निवडण्यासाठी काही खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 12:19 PM2018-07-09T12:19:01+5:302018-07-09T12:20:02+5:30
टुथब्रश निवडताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला टुथब्रश कसा निवडावा यासंदर्भात सांगणार आहोत.
सुंदर चेह-यासोबतच सुंदर हास्य हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच दातांची योग्य काळजी घेणं हे सुद्धा फारच महत्वाचं असतं. दातांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकजण टुथब्रशचा वापर करतो. मात्र, दात स्वच्छ असण्यासाठी योग्य टुथब्रशची निवड करणं महत्वाचं आहे. टुथब्रश निवडताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला टुथब्रश कसा निवडावा यासंदर्भात सांगणार आहोत.
1) टुथब्रश निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रशचे ब्रिसल्स नरम असणे. नरम ब्रिसल्स असलेल्या टुथब्रशमुळे दातांची स्वच्छता योग्य पद्धतीने करता येते. तसेच हिरड्यांनाही त्रास होत नाही. कडक टुथब्रश असल्यास हिरड्यांना त्रास होतो आणि परिणाम हिरड्यांमधून रक्त येतं.
2) टुथब्रशचं तोंड गोलाकार असेल अme आणि लहान टुथब्रश वापरण्याचा प्रयत्न करावा. लहान टुथब्रश असल्यास कोना-कोप-यात पोहचण्यास मदत होते आणि दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता करता येते. तर मोठा टुथब्रश असल्यास कोप-यापर्यंत पोहचण्यात अडचण येते.
3) जर तुमच्या हिरड्या संवेदनशील असतील तर तुम्हाला सेंसेटिव्ह टुथब्रशची निवड करणं गरजेचं आहे. असे टुथब्रश बाझारात उपलब्ध असून याचा वापर केल्याने हिरड्यांना त्रास होत नाही.
4) जर तुमच्या दातांची रचना एक सारखी नसेल म्हणजेच मागे–पुढे असेल तर झिक झॅक ब्रिसल्स असलेले टुथब्रश वापरणं गरजेचं आहे. सामान्य टुथब्रश वापरल्यामुळे तुमच्या दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता करता येणार नाही.
5) नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की, टुथब्रशच्या हँडलची लांबी कमी असावी. लांबी मोठी असल्यास तुम्ही योग्य पद्धतीने त्याचा वापर करु शकत नाही. तसेच टुथब्रश खरेदी करताना त्याची कॅपही खरेदी करा आणि टुथब्रश धुतल्यानंतर ती कॅप त्याला लावून ठेवा.
6) स्वच्छ दातांसाठी आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी योग्य पद्धतीने दात घासणं गरजेचं आहे.