​सुंदर दिसण्यासाठी मानेची घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 04:58 PM2016-11-20T16:58:48+5:302016-11-20T16:59:38+5:30

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

Take care of the necklace to look beautiful! | ​सुंदर दिसण्यासाठी मानेची घ्या काळजी !

​सुंदर दिसण्यासाठी मानेची घ्या काळजी !

googlenewsNext
-Rav
indra More

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी बऱ्याच महिला ब्युटीपार्लरमध्ये जातात व आपला चेहरा सुंदर करतात. मात्र, आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा बऱ्याच कारणांमुळे मानेभोवती धूळ साचून टॅन तयार होतो. त्याचप्रमाणे सुरकुत्याही येतात. यामुळे मान आपले सौंदर्य खराब करते. एकंदरीत याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होतो. आजच्या सदरात आपण आपले सौंदर्य खुलविण्यासाठी मानेची काळजी कशी घ्याल याबाबत जाणून घेऊया...

* मानेच्या स्वच्छतेअभावी आपल्या सौंदर्यात बाधा येत असेल तर लिंबूवर्गीय फळांचा वापर नक्की करा. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’हे नैसर्गिक ब्लिचिंग क्वालिटी तत्त्व आहे. त्यासाठी लिंबू मिठात बुडवून हळुवार मानेभोवती चोळावे आणि त्यानंतर १५ मिनिटांनी आंघोळ करावी. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर लिंबाचा रस गुलाब पाण्यात मिक्स करून मानेला लावा.

* घट्ट दुधात दोन चमचे टॅँगरिन पावडर घेऊन ते मिक्स करा व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेभोवती लावून कोरडी झाल्यानंतर धुवा. यामुळे आपल्या मानेचे पर्यायी चेहऱ्याचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. 

* घट्ट मिल्क क्रिम किंवा दह्यात दोन ते तीन चमचे ओट्स पावडर घ्या आणि मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा. टोमॅटोच्या गरामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण मानेभोवती लावा आणि सुकल्यानंतर आंघोळ करा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास चांगला रिझल्ट दिसून येतो. 

* नैसर्गिक त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी बटाटादेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. बटाट्याला स्कीन लाईटर म्हणून वापरता येतो. यासाठी बटाट्याचे दोन स्लाईस घ्या आणि दहा मिनिटे ते मानेभोवती चोळा. तीन दिवसातून एकदा असे केल्यास मानेभोवतालचा त्वचा टोनमध्ये बराच फरक जाणवतो.

* मान काळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मृत पेशी साचणे होय. या मृत पेशी काढण्यासाठी काकडीचा उपयोग सर्वाेत्तम आहे. यासाठी काकडीचा गर पॅक म्हणून मानेवर लावू शकता. हा पॅक सुमारे १५ मिनिटांनी धुवून त्यावर गुलाब पाणी लावा. तसेच केवळ आॅलिव आॅईलमध्ये मिक्स करुन पॅक बनवा आणि हा पॅक मानेभोवती लावा. यामुळे मानेभोवतालची त्वचा उजळण्यास मदत होईल.

* त्वचेचा टोन वाढविण्यासाठी दुधाच्या सायमध्ये देखील क्षमता आहे. यासाठी थोडी साय घेऊन ती मानेवर लावा व हळूवार मसाज करा. त्यानंतर थोड्यावेळाने कोमट पाण्याने धुवा. एक दिवस आड असे करत राहिल्यास त्वचेमध्ये बराच फरक झालेला जाणवेल. कोरफडचा गर मानेवर लावल्यासही त्याचा चांगला उपयोग होतो.  

Web Title: Take care of the necklace to look beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.