शेविंग केल्यावर पिंपल्स येतात? बदला दाढी करण्याची पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 11:40 AM2018-11-08T11:40:17+5:302018-11-08T11:40:50+5:30
अलिकडे जरी बिअर्ड लूकची फॅशन वाढली असली तरी अनेकांना अजूनही क्लिन शेव लूक ठेवणे पसंत आहे. पण यासाठी त्यांना सतत शेविंग करत रहावं लागतं.
(Image Credit : The Manual)
अलिकडे जरी बिअर्ड लूकची फॅशन वाढली असली तरी अनेकांना अजूनही क्लिन शेव लूक ठेवणे पसंत आहे. पण यासाठी त्यांना सतत शेविंग करत रहावं लागतं. पण योग्यप्रकारे शेविंग न केल्याने अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. तसेच सतत चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्याने काही काळाने त्वचा काळी आणि सैल होऊ लागते. अनेकदा शेविंग केल्यावर त्वचसंबंधी रोग जसे की, पिंपल्स, रॅशेज किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होतात. तुम्हालाही जर शेविंग केल्यावर काही त्वचेसंबंधी समस्या होत असतील तर तुम्हाला तुमच्या शेविंगची पद्धत बदलायला हवी आणि काही त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आधी चेहरा स्वच्छ धुवा
शेविंग करण्याआधी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचं असतं. यासाठी जर कोमट पाण्याचा वापर केला जर दाढी करताना जळजळ कमी होते. कोमट पाण्याने दाढीचे केस भिजवले तर शेविंग करायला सोपं जातं. तसेच कोमट पाण्याने चेहऱ्याचा तेलकटपणाही दूर होतो आणि मृत पेशीही दूर होतात. जर शेविंग करताना जास्तच जळजळ होत असेल किंवा दाढी फारच रफ असेल तर गरम पाण्यात भिजवेलेल्या टॉवेलने दाढीला पाच मिनिटे मुलायम करा.
ब्रश कसा असावा?
शेविंगचा ब्रश मुलायम असायला हवा. ब्रशते दाते जर फार रफ असतील तर गालावर याने जळजळ किंवा वेदना होऊ शकतात. हार्ड ब्रशच्या वापराने तुमच्या गालावर पिंपल्स होण्याचाही धोका अधिक असतो. ब्रश फारच रफ असेल तर गालाची त्वचा याने कापली जाऊ शकते आणि तुम्हाला त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोक क्रीमऐवजी फोम(फेस) चा वापर करतात आणि हातानेच फोम चेहऱ्यावर लावतात. पण फोम हातांऐवजी ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावायला पाहिजे. कारण हातावरील बॅक्टेरिया चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान करु शकतात.
रेजर कसं असावं?
जर तुम्ही एकदाच वापरलं जाणारं रेजर वापरत असाल तर ते चांगल्या क्वालिटीचं असावं. पण जर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच तेच रेजर वापरत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. तसेच दाढी कऱण्याआधी रेजर ५ मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवावं. याने रेजरवरील किटाणू नष्ट होतात आणि रेजरही दाढीवर सहजपणे काम करतं.
कसे कराल शेविंग
जर तुम्हाला दाढी केल्यावर पिंपल्स येत असतील तर दाढी नेहमी वरुन खालच्या दिशेने केली पाहिजे. पण जर तुम्ही चेहऱ्यावरील त्वचा गुळगुळीत करण्यासाठी उलटी दाढी करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. याने त्वचा कापली जाण्याचीही भीती असते.
आफ्टर शेव लावा
शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर आफ्टर शेव लोशन किंवा स्प्रे नक्की लावा. याने दाढी करताना चेहऱ्यावर जे बॅक्टेरिया राहतात त्याने चेहऱ्याचं नुकसान होतं. जर तुम्हाला आफ्टर शेव लावल्याने फार जास्त जळजळ होत असेल तर तुम्ही तुरटी लावू शकता.