चेहऱ्याच्या ‘ग्लो’साठी वापरा चंदन पावडर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 6:00 PM
आज प्रत्येक तरुणीला आपला चेहरा ग्लो दिसावा असे वाटते. त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र त्यातीलच चंदन पावडर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
आज प्रत्येक तरुणीला आपला चेहरा ग्लो दिसावा असे वाटते. त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र त्यातीलच चंदन पावडर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. चंदन पावडरच्या वापराने त्वचा केवळ मऊ आणि चमकदारच होत नाही तर त्यासोबत त्वचेच्या इतर समस्याही कमी होतात. चंदन पावडर लावण्याचे फायदे अनेकांना माहितच असतात, पण ती पावडर कशी लावावी, याची माहिती खूप कमी जणांना असते. यामुळे चुकीच्या पद्धतीने पावडर लावली जाते आणि त्याचे परिणामकारक फायदे मिळत नाही. जर तुम्हाला चंदन पावडरचा हवा तसा परिणाम पाहिजे असेल खालील योग्य पद्धतीने चंदन पावडरचा वापर करावा. प्रथम एक चमचा चंदन पावडर घ्या किंवा चंदन पावडर नसेल तर चंदनाचे लाकुड दगडावर घासून ओले करुन घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा दूध किंवा गुलाबजल टाका. त्यात हळदही टाकू शकतात. हळदीत अॅटी-सेप्टीक गुण असतात. दुधामुळे चेहऱ्याच्या त्वचेला मऊपणा प्राप्त होतो आणि गुलाबजलमुळे फ्रेशनेस येतो. हळदीचा वापर करायचा नसल्यास काही हरकत नाही. पूर्ण चेहऱ्यावर एक प्रकारे पेस्ट लाऊन घ्या. पेस्ट सगळीकडे समप्रमाणात लागली आहे ना, याकडे लक्ष द्या.पेस्ट वाळत नाही तोपर्यंत चेहरा धुऊ नका. कमीत-कमी २० मिनिटांनंतर चेहरा धुऊन घ्या. यानंतर चेहरा मऊसर कापडाने पुसून घ्या. तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो स्पष्ट जाणवेल. हा उपाय आठवड्यातून एकदा जरी केला तरी त्याचे परिणाम लवकरच दिसायला लागतील.